चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षांची शिक्षा
खामगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात शौचास जात असलेल्या चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत 20 वर्षांची सक्तमजुरी व विविध गुन्ह्यात तब्बल 40 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
खामगाव शहरातील रॅलीज प्लॉट दालफैल भागातील कैलास गोपाल निमकर्डे (वय 52) याच्या घराच्या अंगणासमोरुन एका 11 वर्षीय मुलगी शौचास जात असताना तिला कैलास निमकर्डे याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 2 वर्षांपूर्वी भरदुपारी घडली होती. घडलेल्या प्रकाराची माहिती सदर मुलींनी आईला सांगितली. त्यामुळे तिच्या आईने खामगाव शहर पोलिस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकारांची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी निमकर्डे याच्याविरुद्ध कलम 376, 342 सह अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कलम 4,6,8 नुसार गुन्हा दाखल केला होता.
हेदेखील वाचा : कारगिल युद्धातील माजी सैनिकाला नागरिकत्व सिद्ध करण्यास भाग पाडल्याचा आरोप; पुण्यातील कुटुंबाची तक्रार
दरम्यान, या प्रकरणाचा तपास खामगाव शहर पोलिसांनी करून सदर प्रकरण न्यायप्रचिष्ट केले होते. त्यानंतर आता याचा निकाल आला असून, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणांमध्ये नोंदविण्यात आलेल्या साक्षी पुराव्यावरून आरोपी निमकडे यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे त्याला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येक गुन्ह्यात 10 हजार रुपये असा एकोणतीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाची सक्त मजुरी त्याचप्रमाणे सहा महिन्याची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, सहा महिन्यांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड 40 हजार रुपयांचा दंड आणि 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Latur News: पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल; अनेक वर्षांपासून होते प्रेम संबंध