Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2026 | 08:15 AM
मोठी बातमी ! 20 लाखांच्या लाचप्रकरणी GST च्या राज्य कर उपायुक्तासह सहाय्यक कर आयुक्ताला अटक

मोठी बातमी ! 20 लाखांच्या लाचप्रकरणी GST च्या राज्य कर उपायुक्तासह सहाय्यक कर आयुक्ताला अटक

Follow Us
Follow Us:

देवरी : ले-आऊटबाबत अहवाल सादर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

संदेश बोरकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणातील तक्रारदार हे देवरी येथील रहिवासी असून, त्यांच्या लेआऊट संदर्भात प्राप्त तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने शुक्रवारी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी दिवसभर कार्यालयाचे कामकाज आटोपल्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास तक्रारदाराने ठरलेली लाचेची रक्कम आरोपी संदेश याला दिली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

हेदेखील वाचा : Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले, अरविंद राऊत, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, पोलिस नाईक संतोष शेंडे, अशोक कापसे यांच्यासह इतरांनी केली.

उच्च न्यायालयात याचिका दाखल

तक्रारदाराने उच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल आहे. या याचिकेचा अहवाल सादर करण्यासाठी आरोपी संदेश याने तक्रारदाराकडे दीड हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यावर कारवाई करण्यात आली.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : कॅबिनेटमंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

कोल्हापुरातही लाच प्रकरण समोर

दुसऱ्या एका घटनेत, हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगूड एसटी बसस्थानक परिसरात 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुरगूड परिसरात खळबळ उडाली.

Web Title: Assistant revenue officer caught accepting bribe of rs 1500

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • Bribe Case
  • crime news

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.