लातूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीचे अनैतिक संबंधातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २८ जुलै रोजी अहमदपूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव भीम उत्तम चव्हाण असे आहे.
Pune Crime News: भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण; तुळजापूर येथून टोळीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी भीम उत्तम चव्हाण आपल्या घरातील पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी ही माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ भीम यांना अहमदपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. त्यानंतर शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात भीमा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
मृतकाचा सख्खा भाऊ अर्जुन उत्तम चव्हाण यांनी अहमदपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत भीम यांची पत्नी कल्पना भीम चव्हाण आणि गावातीलच देविदास राजाराम चव्हाण या तरुणाशी गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याच कारणामुळे आपल्या भावाने मानसिक तणावातून गळफास घेतल्याचा आरोप केला आहे.
गुन्हा दाखल
फिर्यादीनुसार, अहमदपूर पोलिसांनी मृतकाची पत्नी कल्पना चव्हाण आणि देविदास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी, मृतकाच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
दिल्लीतील CA तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने संपवले आयुष्य
दरम्यान,राजधानी दिल्ली येथून एक भयंकर आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या गोल मार्केट परिसरात एका हॉटेलमध्ये एका चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव धीरज कंसल (वय २५ वर्षं) असे आहे. धीरज कंसल ने अत्यंत भयानक पद्धतीने आपले आयुष्य संपवले आहे. धीरज कंसल याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
अत्यंत विचित्र अवस्थेत सापडला मृतदेह
धीरज कंसाला याने एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली. धीरजने स्वतःच्या शरीरात हेलियम गॅसभरून आयुष्य संपवले. दिल्ली बाराखंबा पोलिसांना त्याचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत बेडवर आढळून आला. अत्यंत विचित्र अवस्थेत सापडला आहे. धीरजने स्वत:च्या शरीरात हेलिअम गॅस भरुन आयुष्य संपवले. धीरजच्या तोंडात एक पाईप होता. धीरज कंसल याने तोंडावर एक मास्क घातला होता. हा मास्क एका सिलेंडरला जोडला होता. तसेच धीरज याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत:च्या चेहऱ्याभोवती एक प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली होती. धीरजने नळीद्वारे सिलेंडरमधील हेलिअम वायू तोंडावाटे शरीरात भरला आणि आत्महत्या केली.
कर्ज घेताय? तर थोडी खबरदारी घ्याच ! महिलेच्या परस्पर काढलं गेलं कर्ज, हफ्ते थकले अन् नंतर…