Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

दौंड तालुक्यातील वासुंदे येथील गावकामगार तलाठी बाळासाहेब हरिश्चंद्र चव्हाण यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 09, 2025 | 06:01 PM
तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली 'ही' मोठी शिक्षा

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात. अशातच आता दौंड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील वासुंदे येथील गावकामगार तलाठी बाळासाहेब हरिश्चंद्र चव्हाण यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवले आहे. आरोपींना दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

किरण लक्ष्मण खराडे आणि आकाश कैलास ताकवणे (दोघेही रा. हिंगणीगाडा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. ४ जानेवारी २०२३ रोजी तलाठी बाळासाहेब चव्हाण हे शासकीय कामानिमित्त पाटस येथील मंडल अधिकारी कार्यालयाकडे जात असताना बसस्थानकाजवळ आरोपी किरण खराडे व आकाश ताकवणे यांनी त्यांना अडवून मारहाण केली. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटस पोलीस चौकीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी आरोपींविरुद्ध बारामती जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश हितेंद्र वाणी यांनी सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) निकाल देत आरोपींना दोषी ठरवले.

मारहाणीप्रकरणी दोन्ही आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५,००० रुपये दंड, धमकी दिल्याप्रकरणी किरण खराडे याला एक वर्षे सश्रम कारावास व २,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड विकास घनवट यांनी काम पाहिले. फिर्यादी, पंच, साक्षीदार व तपास अधिकारी यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. घनवट यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक गोरख कसपटे आणि हवालदार वेनूनाद ढोपरे यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.

पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवार पेठेत कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विसर्जन सोहळा सुरू असताना शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ही घटना रात्री घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ४५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Court sentences 2 accused for assaulting talathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Daund Crime

संबंधित बातम्या

Andekar Gang History : टोळीप्रमुख ते राजकारण; आंदेकर टोळीचा संपूर्ण इतिहास वाचा सविस्तर
1

Andekar Gang History : टोळीप्रमुख ते राजकारण; आंदेकर टोळीचा संपूर्ण इतिहास वाचा सविस्तर

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?
2

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

Crime News Updates : आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
3

Crime News Updates : आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक

पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार; रात्री दारू पिऊन घरी आला अन्…
4

पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार; रात्री दारू पिऊन घरी आला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.