
Crime news live updates
Crime news Today Live : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामुहिक बलात्कार प्रकरणात गेले सहा महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला वालचंदनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वालचंदनगर पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला रात्री उशीरा पुण्यात आणण्यात आले. पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामुहिक बलात्कार प्रकरणात गेले सहा महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला वालचंदनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वालचंदनगर पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला रात्री उशीरा पुण्यात आणण्यात आले.
27 Apr 2025 05:58 PM (IST)
मुंबई-बंगळुरु महामार्गावर बावधन येथे एक मोठा अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (२६ एप्रिल) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडला. विशाल आनंदा लामखडे (वय ३०) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. गणेश व्यंकट कासार (वय २२, कोथरूड) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 Apr 2025 05:31 PM (IST)
सिडको परिसरातील पवननगर येथे कबड्डी स्पर्धेनंतर शालेय विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेची नाशिक शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 26) दुपारी साडेबाराच्या सुमारास पवननगर येथील एका शाळेजवळ आठ ते दहा विद्यार्थिनी जात होत्या. याच दरम्यान, कबड्डी स्पर्धेत एका संघाने विजय मिळविल्याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील एका विद्यार्थिनीने त्या गटातील विद्यार्थिनीला थांबवून मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही गटातील विद्यार्थिनी अत्यंत आक्रमक झाल्या होत्या. सुमारे चार ते पाच मिनिटे ही हाणामारी सुरू राहिल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकल्याने या प्रकाराची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
27 Apr 2025 04:36 PM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत गाय वाटप घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यात दोषी आढळलेले भामरागडचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी आयएएस शुभम गुप्ता यांची पुन्हा विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना दिली. शिवाय गेल्या आठ दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू असून दोषींना कदापी पाठीशी घातले जाणार नाही, असेही मंत्री अशोक उईके यांनी यावेळी म्हटले आहे.
27 Apr 2025 03:09 PM (IST)
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरपीएफमधून निवृत्त झालेल्या एका जवानाने, एका लग्नाच्या हळदी समारंभात, आपल्या स्वतःच्या मुलीवर गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावईही गंभीर जखमी झाला आहे. यावेळी जमलेल्या लोकांनी संतापून वडिलांना मारहाण केली, ज्यामध्ये तेही गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री सुमारास डॉ. आंबेडकर नगर भागात घडली.
27 Apr 2025 02:33 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे हप्ता न दिल्याने पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून माजी उपसरपंच रेश्मा कुसेकर यांचे पती नितीन उर्फ अण्णा कुसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पानटपरी चालकाला लोखंडी गजाने मारहाण केली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किसन नप्ते यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
27 Apr 2025 01:33 PM (IST)
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विक्रीसाठी आलेल्या केळीच्या पानांच्या बंडलची अदलाबदल झाल्याने वाद टोकाला गेला. भर दिवसा 20 वर्षीय तरुणाने पती-पत्नीसह मुलावर कात्रीने वार केला असून यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झालाय. मुलगा गंभीर जखमी असून पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. चमनलाल कारला असे मृत व्यक्तीचे नाव असून मुलगा कार्तिक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कल्याण APMC मार्केटमध्ये आज मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
27 Apr 2025 12:56 PM (IST)
जळगावात सैराटची पुनरावृत्ती घडली आहे. प्रेम विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार करत मुलीला ठार केला आहे. यात जावई गंभीररीत्या जखमी झाले आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात घडली आहे. या घटनेने सर्वत्र परिसरात खळबळ उडाली आहे. या ऑनर किलिंग घटनेत संतप्त लोकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव किरण मांगले आहे. किरण मांगले सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय आहे.
27 Apr 2025 12:29 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या अन्नातून जवळपास ६०० लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला असून १७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्यात घडली आहे. विषबाधेचे नेमके कोणते कारण अजून स्पष्ट झाले नाही आहे.
27 Apr 2025 11:09 AM (IST)
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत आहे. सीआयडीकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्याचा मुक्काम पुढचे अनेक दिवस जेलमध्ये राहणार असल्याची शक्यता आहे. असं असताना त्याच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. वाल्मिक कराड याला जेलमध्ये पॅनिक अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पॅनिक अटॅक आल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आहे.