माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला त्रास; छळ हिंगोलीत पण तक्रार पश्चिम बंगालमध्ये, जाणून घ्या प्रकरण नेमकं काय?
उलवे पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उलवे सेक्टर १८ येथील कितीका ज्वेल्स इमारतीतील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ३९ वर्षाच्या व्यक्तीने एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर शिवीगाळ, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात करवून घेणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thane News: पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्स तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
नेमकं काय घडलं?
दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीचे नाव विशेष गयाप्रसाद वरुण असे असून, तो मूळचा कानपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. आरोपीने तक्रारदार महिलेला लग्नाचे आमिष दाखवून १ जानेवारी २०२५ पासून २९ जुलै २०२५ या कालावधीत वारंवार आपल्या घरी बोलावून घेतले. या दरम्यान तिला वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यांनतर फिर्यादी महिला ही गरोदर राहिली. त्यानंतरही आरोपीने तुझ्या परवानगीशिवाय जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. तसेच, या प्रकरणाची तक्रार पोलिसात दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तिने सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी अर्जुन रजाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
आधी बलात्कार,नंतर बळजबरीने गर्भपात केल्याचा आरोप; पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर येथे पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना आधी महिलेवर बलात्कार केला त्यानंतर ती गर्भवती झाल्यानंतर बळजबरीने महिलेचा गर्भपात केल्याचं आरोप करण्यात आला आहे. तक्रार दाखल करण्यात आलेल्या आयुक्तांचा नाव भारत प्रभाकर राठोड असं आहे.