Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

महिलेने या व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून आपला मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटच्या ट्रस्टीन कॉइन या वेब एप्लीकेशनचा सीनियर अकाउंटंट मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 02:26 PM
Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

Follow Us
Follow Us:

क्रिप्टो करन्सीमध्ये ज्यादा नफ्याचे प्रलोभन दाखवत केली पैशांची लूट 
संशयित आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
ऑनलाइन पद्धतीने लावला चुना

रत्नागिरी: फेसबुक वर झालेली महिलेची ओळख एका व्यावसायिकाला महागात पडली आहे. क्रिप्टोक्रम करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये मिळविण्य मिळविण्याचे प्रलोभन दाखवत या भामट्या महिलेने या व्यावसायिकाला ३६ लाख ६५ हजार रुपयांना ऑनलाइन चुना लावला आहे. फसवणुकीची ही घटना 4 जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी येथील गांधी फॅब्रिकेटर्स या फिर्यादीच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने सुहानी शर्मा आणि डॅनियल या दोघांविरोधात रत्नागिरी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये या व्यावसायिक फिर्यादीने म्हटले आहे की फेसबुक या समाज माध्यमावर सुहानी शर्मा या महिलेशी त्यांची ओळख झाली होती. त्या महिलेने या व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून आपला मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटच्या ट्रस्टीन कॉइन या वेब एप्लीकेशनचा सीनियर अकाउंटंट मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले.

त्यानंतर फिर्यादीला यूएसडीटी ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे प्रलोभन दाखवले. फिर्यादी व्यावसायिकाने महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिचा मित्र डॅनियल याने व्हाट्सअप वर पाठवलेल्या एप्लीकेशन लिंक वर क्लिक करून त्या अॅप्लिकेशनला लॉगिन केले. त्यानंतर आरोपीने २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या ११ दिवसांच्या कालावधीत वेळोवेळी दिशाभूल करीत फिर्यादीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. याप्रकारे फिर्यादीने संशयीताच्या प्रलोभनांना बळी पडून या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये फिर्यादी कडून गुंतवून घेतले आणि फसवणूक केली. फिर्यादी व्यावसायिक यांनी रत्नागिरी सायबर पोलिसांकडे धाव घेत याबाबतची तक्रार दिली आणि या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांचे कारस्थान

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ऑनलाईन चलन केले जाते. याच माध्यमातून नाशिकमध्ये फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक विभागाकडून देण्यात आलेले ई-चलन प्रलंबित असल्याचा खोटा मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल २६ लाख रूपयांवर डल्ला मारला. यात एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातील कर्जाच्या स्वरूपात आलेल्या १८ लाख रूपयांचाही समावेश आहे.

ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, खासगी नोकरी करणाऱ्या तक्रारदाराने एका गरजेसाठी १८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम संबंधित बँकेने थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली. यानंतर, काही तासांतच तक्रारदाराच्या व्हॉट्सअॅपवर ‘आरटीओ ई-चलन’ चा संदेश आला. या संदेशासोबत एपीके फाईल जोडलेली होती. तक्रारदाराने सदर फाईल अधिकृत समजून त्यावर क्लिक केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Cyber crime with businessmen rs 36 lakhs fraud ratnagiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • cyber crime
  • online fraud
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका
1

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
2

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
4

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.