crime (फोटो सौजन्य: social media)
आज काल सायबर फसवणूक वाढत चालले आहे. या फसवणुकीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. आता एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम एवढं महागात पडले की त्यांना धक्काच बसला. प्रेम आणि खोट्या सहानुभूतीच्या नावाखाली ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल ९ कोटी रुपयांना गंडवले. एकाच वेळी नाही तर हळूहळू करून फसवणूक करण्यात आली. तब्बल ७३४ आर्थिक व्यवहार केल्यानंतर ही फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
एप्रिल २०२३ मध्ये पीडित ज्येष्ठ नागरिकाने फेसबुकवर ‘शावी’ नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. सुरुवातीला तिने ते नाकारली, पण काही दिवसांनी त्याच शावीने पून्हा रिक्वेस्ट पाठवली आणि पीडित व्यक्तीने ते स्वीकारली. त्यांनतर दोघांमध्ये फेसबुक चॅट होऊ लागले. नकळत दोघांमध्ये मैत्री आणखी घट्ट होत गेली. दोघे व्हॉट्स अप वर बोलू लागले.
शावीने जेव्हा स्वतःची ओळख करून दिली तेव्हा ती घटस्फोटित असून दोन मुलांची आई असल्याची सांगितले. तसेच कौटुंबिक त्रास आणि आर्थिक संकटात असल्याची माहिती तिने नागरिकाला दिली. तिने ज्येष्ठ नारिकाला प्रायटेक वेळेस विविध कारणे देत पैसे उकळले. दोघांमधील अश्लील चॅटचा गैरफायदा घेऊन कालांतराने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्याकडून टप्या टप्याने 9 कोटी रुपये उकळण्यात आले. ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी महिलेचं नाव वापरुन त्याशिवाय कौंटुबिक आर्थिक कारणं सांगत वेळोवेळी पैसे पाठवण्यास भाग पाडलं. अखेर पीडित व्यक्तीकडचे पैसे संपताच त्यांनी मुलाला पैसे मागितले. त्यांच्या मुलानं वडिलांकडे 9 कोटी रुपये होते मात्र ते का पैसे मागत आहेत असं विचारलं असता ज्येष्ठ नागरिकानं घडलेली सगळी घटना मुलाला सांगितली.तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला.
सायबर चोरटयांनी महिलेचं नाव वापरून ज्या बँक खात्यांची माहिती पाठवली त्या खात्यावर ज्येष्ठ व्यक्तीने पैसे पाठवले. हा सर्व प्रकार जवळपास २२ महिने सुरु होता. या २२ महिन्यात तब्बल 734 व्यवहार करण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकाला मिळाल्यानंतर त्याला याचा चांगलाच धक्का बसला. पीडित व्यक्तीने आणि त्यांच्या मुलाने मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे 6 ऑगस्ट रोजी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्याला गंडवलं; शेतीही विकली अन् नंतर 22 लाखांची फसवणूक झाली