Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला; ३ जणांची तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून पोलीस कारवाईची भिती दाखवून फसवणूकीचे सत्र कायम असून, पुण्यातील एका २८ वर्षीय नोकरदार तरुणीला १० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 28, 2024 | 05:50 PM
Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला; ३ जणांची तब्बल 'इतक्या' लाखांची फसवणूक

Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला; ३ जणांची तब्बल 'इतक्या' लाखांची फसवणूक

Follow Us
Follow Us:

पुणे: सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला असून, पुन्हा तीन घटनांमध्ये दोन तरुणी अन् एका तरुणाची ३३ लाखांना गंडा घातला आहे. वेगवेगळ्या बहाण्याने तसेच पोलीस कारवाईची भिती घालून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ३० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व वापरकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी नोकरी करते. दरम्यान, तिला सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवून त्यांना नुवामा प्रो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच, त्यानंतर त्याच्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यांना या अॅपवरून भरघोस नफा मिळत असल्याची बतावणी केली. त्यांनी १० लाख ९५ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना नफा मिळाला नाही. दुसऱ्या घटनेत तरुणाची तब्बल १२ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तरुणाला युट्यूब पेजला लाईक्स व सबस्क्राईब केल्यावर मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्याला पैसे भरण्यास भाग पाडले. परंतु, त्याला कसलाही नफा न देता त्याची फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलीस कारवाईची भिती दाखवून फसवणूक

सायबर चोरट्यांकडून पोलीस कारवाईची भिती दाखवून फसवणूकीचे सत्र कायम असून, पुण्यातील एका २८ वर्षीय नोकरदार तरुणीला १० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणीला मुंबई ते इराण असे पाठविलेल्या पार्सलमध्ये कालबाह्य पाच पासपोर्ट, क्रेडीट कार्ड आणि पेन ड्राईव्ह सापडले आहे. त्यामुळे तुमचे खाते तपासावे लागेल असे सांगितले. नंतर त्यांचा विश्वास संपादनकरून तसेच त्यांना पोलीस कारवाईची भिती दाखवून त्यांना १० लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

कांदा व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक

बंगळुरुमधील एका कांदा व्यापाऱ्याची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कांदा व्यापाऱ्याने मालाची ऑर्डर देऊन पैसे दिल्यानंतर देखील त्याला कांदा न पाठवता फसवणूक केल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी धनंजय खुशालचंद बोरा याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत शशीकुमार टी. वैद्यलिंगम पिल्लई (वय ४६, रा. रवींद्रनगर, बंगळुरू, कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे.

हेही वाचा: कांदा व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक; ऑनलाईन पैसे घेतले अन्…

पोलिसांच्या माहितीनुसार, शशीकुमार बंगळुरूमधील कांदा व्यापारी आहेत. त्यांनी पुण्यातील मार्केटयार्ड येथील घाऊक बाजारातून कांदा खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले होते. तेव्हा त्यांचा बोरा याच्याशी संपर्क झाला होता. बोरा याने मार्केट यार्डात त्याचे गाळे असल्याचे सांगितले होते. नंतर शशीकुमार यांनी त्याच्याकडून २५ टन कांदा खरेदीचा व्यवहार केला. त्यापोटी त्याला ५ लाख रुपये पाठविले. २ नोव्हेंबर रोजी ट्रकमधून कांदा बंगळुरुतील पाठविल्याचे बोराने त्यांना सांगितले.

 

Web Title: Cyber fraud with three peoples for 33 lakhs rs pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • cyber crime
  • online fraud
  • Pune

संबंधित बातम्या

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त
1

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…
2

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत
3

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू
4

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.