crime, (फोटो सौजन्य- pinterest)
पुणे : पुण्यातील दौंड शहर येथे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या वादातून हि हत्या झाल्याचं समोर आलं आहे. चौघांनी मिळून तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. विटा आणि सिमेंटच्या चौकटीने केलेल्या जबर मारहाणीमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. चार आरोपींनी त्याला अडवून निर्दयी मारहाण केली. या हल्ल्यात विटा आणि सिमेंटच्या चौकटीचा वापर करण्यात आला आहे. यात तो गंभीर जखमी झाला. हत्या झालेल्या तरुणाचे नाव केतन सूज असे असून तो स्थानिक रहिवासी आहे. या घटनेने दौंड परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी निखिल चितारे, प्रेम जाधव, विवेक कांबळे आणि विक्रांत कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी कट रचून केतनवर हल्ला केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हत्येनंतर अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. घटनासथळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर खटला चालवला जाणार आहे. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेची चौकशी वेगाने सुरु असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन संपूर्ण प्रकरणाचा तपशील समोर येईल, असा विश्वास दौंड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सातारा हादरलं! गर्भवती महिलेने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत मारली उडाली
सातारा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गरोदर महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. यात महिलेचा आणि एका चिमुकलीचा मुत्यू झाला आहे. तर एकीला वाचाव्यात स्थानिकांना यश आले आहे. साताऱ्यातील परळी खोऱ्यातल्या कारी येथे हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jalgaon Crime : लग्नाचे अमिश देऊन लैंगिक शोषण! अखेर जळगावमधील वादग्रस्त पोलीस निरीक्षक निलंबित