जळगाव: जळगावमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेलचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या घटना समोर आली होती. हा आरोप स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर कारणात आला होता. त्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. या संधर्भात आदेश नाशिक परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने निरीक्षक पाटील यांच्यावर नैतिकता सोडून कृत्य केल्याचा ठपका ठेवला होता.
Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक
महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या
जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान चाळीसगावमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा प्रकार घडल्याकडे लक्ष वेधले होते. पोलिसांत तक्रार केल्यास सदर महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच आमदारांकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांनाही गोळ्या झाडण्याची धमकी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यासंदर्भात आपल्याकडे ध्वनीमुद्रीत पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याच दिवशी पीडित महिला जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधित निरीक्षकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोहोचली होती. परंतु, पीडित महिलेने ऐनवेळी विचार बदलल्याने निरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार काढण्यावर तेवढे निभावले.
दरम्यान, पोलीस प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगण्यास कारणीभूत ठरलेल्या संबंधित निरीक्षकाची तडकाफडकी उचलबांगडी करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केली. मात्र, आमदार चव्हाण यांचे आरोप हवेत विरल्याची टीका त्यानंतर झाली. याअनुषंगाने आमदार चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची भेट घेत महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाला निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या संबंधित निरीक्षकावर नैतिकतेला सोडून कृत्य केल्याचा ठपका ठेवला. पुढील कारवाईच्या अनुषंगाने त्यासंदर्भात विशेष पोलीस महासंचालकांकडे पत्र व्यवहार देखील केला.
निलंबनाची कारवाई आली आहे
अखेर, लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर नाशिक परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशान्वये शुक्रवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात निरीक्षक पाटील यांची प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याकडे असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, वादग्रस्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे त्यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार काढण्यात आल्यापासून नियंत्रण कक्षात हजर होण्याऐवजी वैद्यकीय रजेवर गेले आहेत.
Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक