Dead body of 22-year-old girl found in lake in Talegaon Dabhade Crime News
Pune Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव मावळमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे परिसरातील एका तलावात २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी ११:३० दरम्यान उघडकीस आली आहे. पाण्यामध्ये पडलेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे मावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ए
साक्षी कांतीकुमार भावर (वय २२ रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे या मावळ, मूळगाव बऊर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीला अनेकदा फोन लावल्यानंतर ती फोन उचलत नव्हती. तसेच ती कुठे सापडत नसल्याने आणि घरी न परतल्याने तिच्या नातेवाइकांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस निरीक्षक प्रविण कांबळे व पोलीस उपनिरीक्षक भरत वारे यांनी तत्काळ लोकेशन तपासले असता ते स्टेशन लगतच्या तलाव परिसरात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने तलाव परिसरात शोधमोहीम सुरू केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, तलावाच्या काठावर साक्षीची बॅग व मोबाईल आढळून आला. तपासणीदरम्यान तरंगणारे बूट दिसल्याने संशय बळावला. वारे यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना संपर्क केला. संस्थेची आपत्ती व्यवस्थापन टीम अल्पावधीतच घटनास्थळी दाखल झाली.
संस्थेचे सदस्य राजेंद्र बंडगे व गणेश गायकवाड यांनी तलावाच्या पाण्यात शोध घेतला असता, साक्षीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. तिचा भाऊही घटनास्थळी उपस्थित असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात अडथळा आला नाही. तिला तात्काळ सीपीआर देऊन तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र फार उशीर झाल्यामुळे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिला हॉस्पिटलला नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भरपावसात महिला अडकली नदीकाठी
मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत १९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंडुब्रे गावाजवळील नदीकाठी एक महिला अडकून पडली होती. तिच्या जीवघेण्या अवस्थेत दिलेल्या मदतीच्या आर्त हाकेला तळेगाव दाभाडे पोलिस व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रतिसाद मिळाला आणि अखेर त्या महिलेचा जीव वाचवण्यात यश आले. ग्रामस्थांनी “नदीकाठी कोणी तरी मदतीसाठी आवाज देत आहे” अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी प्रशांत सोनवणे यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. गराडे यांनी लगेचच संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला सतर्क केले.