crime (फोटो सौजन्य : social media)
छत्रपाती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक कामगार ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना अचानक बाजूचा मलबा अंगावर पडून क्षणातच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील काबरानगरमध्ये घडली आहे. मुकुंद दगडू साळवे असे मृतकाचे नाव आहे.
धक्कादायक! महिलेची ६ वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या; कारण वाचून बसेल धक्का
कंत्राटदारामार्फत महापालिकेच्या ड्रेनेज खोदकाम साळवे करत होते. दुपारी ड्रेनेज लाईन खोदताना बाजूचा मलबा त्यांच्या अंगावर पडला. त्यात काही लाकडी साहित्य देखील त्यांच्या अंगावर पडली. तातडीने त्याच्या सहकाऱ्यांनी वरील मलबा बाहेर काढला. परंतु याला वेळ लागला. यानंतर साळवे यांना तातडीने गजानन परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी दाखल करून घेणायास नकार दिली. यांनतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत साळवे यांचा मृत्यू झाला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साळवे यांच्या अंगावर मलबा पडण्याचा हा सगळा प्रकार बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
गोंदिया हादरला! जादूटोणाच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धाची हत्या, आरोपीला अटक
गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका ६० वर्षीय वृद्धाची जादूटोण्याच्या संशयावरून धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा /हेटी येथे उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव आसाराम देऊ कांबळे (60) असे आहे. ते जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जादूटोण्याच्या संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
नागपूरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या दोन घटना
नागपुरात अवघ्या काही तासात दोन ज्येष्ठ महिलांसोबत सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या आहेत आणि या चोरी एकाच टोळीने केल्याचं समोर आलं आहे.या चोरीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. भर रस्त्यात ही घटना घडल्यामुळे नागपुरातील रस्त्यांवर चोर बिनधास्त फिरत आहेत कि काय? असा प्रश्न समोर आला आहे.
गोंदिया हादरला! जादूटोणाच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धाची हत्या, आरोपीला अटक