गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका ६० वर्षीय वृद्धाची जादूटोण्याच्या संशयावरून धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा /हेटी येथे उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव आसाराम देऊ कांबळे (60) असे आहे. ते जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जादूटोण्याच्या संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
लातूर हादरलं! ५० रुपयाची उधारी बेतली जीवावर; धारधार शस्त्राने वार….
नेमकं काय घडलं?
मृतक आसाराम कांबळे हे गावाजवळील जंगलच्या शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत घरी परतले नाहीत आणिमात्र शेळ्या घरी आल्या. म्हणून असुरांच्या कुटुंबांनी गावकऱ्यांसह जंगलाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना आसाराम यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना जंगल शिवारातील असल्याने व मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्याने प्रथमदर्शनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्याच्या मृत्यू झाला असावा असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. यानंतर गावकऱ्यांनी घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाला दिली.
वनविभागाला माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार घातपाताचा असल्याचे दिसून आले आहे. यावर त्यांनी गोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पुरषोत्तम अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या पथकाकडून गावात तपास केला असता मृत आसाराम कांबळे याची हत्या भुरु ताराम याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली.
आरोपी भुरु ताराम हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी हेटी (पालेवाडा), मुंडीपार, भंड़गा, हलबीटोला (गोरेगाव) येथे शोध पथके रवाना करण्यात आली असता, रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी भुरु ताराम हा हलबीटोला (गोरेगाव) येथील आपल्या मावशीच्या घरी मिळून आला. यावेळी त्याला हत्येच्या बाबतीत विचारण्यात आल्याने तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यांनतर त्याने हत्येची कबुली दिली. जादुटोणाच्या संशयावरून आसाराम कांबळे यांची डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीने मारून खुन केल्याचे कबुली दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने आरोपी दिनेश उर्फ भुरू यास अटक करून गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक 380/2025, कलम1.03 (1) भारतीय न्याय संहिता – 2023 अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
नागपूरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या दोन घटना; सीसीटीव्हीत कैद