Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक राजकीय कनेक्शन; खरात प्रकरणाचा तपास थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत?

या प्रकरणाचा तपास करत असताना खरातचा निकटवर्तीय दीपक लोंढे याची सखोल चौकशी करण्यात आली असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 21, 2026 | 10:40 AM
Ashok Kharat Nashik Crime News:

Ashok Kharat Nashik Crime News:

Follow Us
Follow Us:
  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला
  • दिपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांचे नाव
  • अशोक खरात याच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
 

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे यात आणखी उलगडे होताना दिसत आहेत. आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणादेखील प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, नाशिकमधील या विकृताशी असलेले संबंध उघडकीस आल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विरोधकांच्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला.

अशातच या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचे नाव पुढे आले आहे. मंत्री दिपक केसरकर यांचे निकटवर्तीयाचेही नाव समोर आले आहे. दिपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांचे नाव समोर आले आहे. विशेष तपास पथकांनी दीपक लोंढे यांची चौकशी सुरू केली आहे. लोंढे आणि अशोक खरात यांच्यात काही ठिकाणी व्यवसायिक संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये दीपक लोंढे आणि अशोक खरात यांच्यात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत लोंढे सक्रीय असल्याचा संशय आहे.

Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी

SIT कडून सखोल चौकशी आणि धक्कादायक खुलासे

स्वयंघोषित अशोक खरातवर नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता विशेष तपास पथकाने (SIT) आपला मोर्चा त्याच्या व्यावसायिक आणि राजकीय संबंधांकडे वळवला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना खरातचा निकटवर्तीय दीपक लोंढे याची सखोल चौकशी करण्यात आली असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आता खरातच्या संभाव्य राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठाकरे सरकारच्या काळातील निर्णयामुळे चर्चा

तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’साठी ३१ जुलै २०२० रोजी, म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात, दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. गोदावरी उजव्या तट कालव्यातून पाणीपुरवठ्यास ही मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि तत्कालीन सरकारमध्ये खरातचा किती दबदबा होता, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Captain Ashok Kharat च्या साम्राज्यावर हातोडा; बंगल्यातून सहा लाख अन् मीरगाव येथून पिस्तूल हस्तगत

नेमके प्रकरण काय?

अशोक खरात याच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी १८ मार्च रोजी पहाटे त्याला ताब्यात घेतले. अनेक बडे नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक खरातकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याने, त्याच्या अटकेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Deepak londhe interrogated by sit over land deals and business links with accused ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Maharashtra Politics
  • Nashik Crime
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
1

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
2

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
3

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
4

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.