Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी
कॅनडा कॉर्नर येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ हे कार्यालय केवळ जमिनीच्या व्यवहारासाठी नव्हते, तर ते अशोक खरातच्या विकृत कृत्यांचे केंद्र बनले होते. खरातने अनेक महिलांवर अत्याचार करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज, मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून जतन केले होते. स्वतःला ‘साव’ मानणारा खरात या पीडितांच्या हतबलतेचा फायदा घेत आपले साम्राज्य चालवत होता.
या प्रकरणात अनेक महिलांचे व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. पीडित-महिलांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र दोन दिवसांच्या अंतरानेही एकही महिला पुढे आलेली नाही. आता या प्रकरणात कोणीही पुढे आले तर बदनामी होईल, एवढ्या भीतीमुळे तूर्तास फिर्यादी महिला समोर आलेल्या दिसत नाही.
नीरजने पैशांसाठी पीडितांना धमकावण्यास सुरुवात केली. त्याने शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो पाठवून तिला घाबरवले. जेव्हा खरातकडून पैसे मिळण्याची आशा मावळली, तेव्हा नीरजने सिडकोतील एका विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहूण्याला पाठवला. हाच त्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ त्याच्यावर उलटला. मेहूण्याने धीर दिल्याने पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे नीरजला खंडणी मिळाली नाही पण या सर्वात खरातच्या साम्रज्याला सुरूंग लागला.
Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती डिसेंबर २०२५ मध्ये ! खरातच्या कार्यालयातील ही सर्व काळी कृत्यं नीरज जाधवच्या हाती लागली. खरात एकटाच यातून ‘मजा’ मारत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने या ५८ महिलांच्या विलप्सचा वापर करून खरातलाच ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मात्र, खरातने या मागणीला दाद न दिल्याने नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवला.






