Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: हॉटेलच्या बेडवर ४० वर्षीय पुरूषाचा मृतावस्थेत आढळला, तर २६ वर्षीय प्रेयसी फरार; नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील आराक्ष रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये 40 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा मृत्यू कसा झाला, नेमकं काय घडलं होत? याचा पोलीस तपास करत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2025 | 05:43 PM
हॉटेलच्या बेडवर ४० वर्षीय पुरूषाचा मृतावस्थेत आढळला, तर २६ वर्षीय प्रेयसी फरार; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य-X)

हॉटेलच्या बेडवर ४० वर्षीय पुरूषाचा मृतावस्थेत आढळला, तर २६ वर्षीय प्रेयसी फरार; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Delhi Crime : मध्य दिल्लीतील आराक्ष रोडवरील नबी करीम परिसरातील एका हॉटेलमध्ये एका पुरुषाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तो त्याच्या २६ वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये पोहोचला होता. जिथे त्याने रात्री ९ वाजेपर्यंत रूम बुक केली होती. त्याची ओळख ४० वर्षीय सचिन सागर अशी झाली आहे. तो रोशनरा रोड सब्जी मंडी परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होता. सचिन हा एक व्यापारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्या खोलीत शारीरक संबंध वाढवणारी औषधे सापडली आहेत. ज्याचा सील उघडा होता. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात सचिनचा मृत्यू लैंगिक उत्तेजन वाढवणाऱ्या औषधांच्या जास्त सेवनामुळे झाल्याचे उघड झाले आहे.

एटीएसची मोठी कारवाई! ज्योती मल्होत्रानंतर ठाण्यात हेरगिरी कनेक्शन उघडकीस, पाक इंटेलिजन्सला माहिती पुरवल्या प्रकरणी कारवाई

नेमकं काय घडलं?

मध्य जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त यांनी सांगितले की, ही घटना बुधवारी घडली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली की, एक ४० वर्षीय पुरूष बुधवारी दुपारी १२:१५ वाजता त्याच्या २६ वर्षीय मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये आला. येथे त्या तरुणाने रात्री ९ वाजेपर्यंत त्याच्या आयडीवरून खोली बुक केली. त्यानंतर दोघेही खोलीत गेले. हॉटेल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, सचिनची मैत्रीण संध्याकाळी ५ वाजता काही सामान घेण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडली होती. नंतर ती परत आली नाही. यानंतर हॉटेल कर्मचारी रात्री ९ वाजता सचिनच्या खोलीत पोहोचले. जिथे सचिन ब्लँकेटने झाकलेला होता. फोन केल्यावरही शरीरात कोणतीही हालचाल झाली नाही, तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांना त्याची नाडी चेक केली, त्यानंतर कर्मचाऱ्यालाही लक्षात आले की, सचिनचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मध्य जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त यांनी सांगितले की, हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मते रात्री ९:३० वाजता निर्धारित वेळ संपली आणि सचिन बाहेर आला नाही तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना खोलीची कडी आतून उघडी असल्याचे दिसले. जेव्हा ते आत पोहोचले तेव्हा सचिन बेडवर ब्लँकेटने झाकलेला आढळला. कर्मचाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीही हालचाल झाली नाही. त्याची नाडी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.

सीसीटीव्ही फुटेज तपास

मध्य जिल्हा पोलिसांचे म्हणणे आहे की,या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले आहे. याशिवाय हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ही आत्महत्या, अपघात किंवा गुन्हेगारी कट आहे. याबद्दल काहीही सांगणे अद्याप लवकर आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर स्थानिक लोक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हॉटेलमध्ये अशा हालचालींवर लक्ष का ठेवले गेले नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पोलिस हॉटेलची भूमिका देखील तपासत आहेत.

पोलीस तपास सुरु

हॉटेल व्यवस्थापनाच्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना खोलीत लैंगिक उत्तेजन देणारी औषधे आढळली. अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे की या औषधांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. तसेच पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल असे पोलिसांचे म्हणणे आहे. यासोबतच सचिनसोबत आलेल्या त्याच्या मैत्रिणीचीही ओळख पटली आहे. पोलिस तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून घटनेची संपूर्ण माहिती मिळू शकेल. सध्या, महिला हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर सचिनने काय खाल्ले किंवा त्याने इतर कोणतेही औषध घेतले का याचाही तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात विवाहित महिलांच्या छळाची मालिका सुरुच; आता थार आणण्यासाठी…

Web Title: Delhi crime boyfriend died hotel room in delhi sex enhancing drugs found girlfriend absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • crime
  • delhi
  • police

संबंधित बातम्या

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!
1

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral
2

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी
3

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा
4

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.