Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: ‘बाबा मला वाचवा’… मुलाला वाचवायला धावलेल्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या; दिल्लीतील घटना

मुलाला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच वडील घटनास्थळी धावले; मात्र गुंडांनी त्यांच्या छातीत गोळी झाडून हत्या केली. दिल्लीतील या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 10:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ट्यूशनवरून परतताना मुलावर काही तरुणांचा हल्ला
  • ‘बाबा मला वाचवा’ म्हणत मुलाने वडिलांना फोन
  • वाद सोडवायला गेलेल्या वडिलांवर गोळीबार
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. 10 वीत शिकणाऱ्या मुलाला काही मुले मारहाण करत होते. याची माहिती पीडित मुलाच्या वडिलांनी मिळाली. मात्र आपल्या मुलाला या मारहाणीतून सोडवत असतांना गुंडांनी त्यांच्या छातीत गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद उमरदिन (३५ वर्षीय) असं नाव आहे.

Bihar Crime: सर, प्लीज गेट उघडा..,फक्त १० मिनिटांचा उशीर आणि बोर्डाची परीक्षा हुकली; विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून मारली उडी

काय घडलं नेमकं?

१५ वर्षांचा मुलगा तहजीम मंगळवारी संध्याकाळी ट्यूशनवरून घरी परतत होता. त्यावेळी वाटेत त्याला काही मुले त्याच्या मित्रांना मारहाण करत असल्याचे दिसले. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या मुलांनी तहजीमलाही पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या तहजीमने तातडीने वडिलांना फोन करून ‘बाबा मला वाचवा’ अशी विनवणी केली. मुलाचा आक्रोश ऐकून उमरदीन आपल्या पत्नीसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.
मात्र उमरदीन तिथे पोहोचल्यावर हल्लेखोर अधिक संतप्त झाले.

हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तूल काढली आणि त्याने आधी हवेत गोळीबार केला. मात्र त्यांनतर थेट उमरदिन यांच्या छातीवर गोळी झाडली. मुलाच्या आणि पत्नीच्या डोळ्यादेखत उमरदिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने गुरु तेग बहादूर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही संशयितांची ओळख पटली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली आहेत. या घटनेने उमरदीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार मुली आणि मुलगा तहजीम असा परिवार आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे.

Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: वडिलांवर हल्ला का झाला?

    Ans: मुलाला वादातून सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी संतप्त झाले आणि गोळीबार केला.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: सीसीटीव्ही तपासणीसह आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Delhi crime dad save me father shot dead while trying to save son incident in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.