
crime (फोटो सौजन्य: social media)
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव रोशन (वय 23) असे आहे. ही घटना गुरुवारी रात्रीचा एकता कॅम्पमध्ये घडली. गुरुवारी रोशनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी माहितीमिळताच घटनास्थळी धाव घेतली. रोशनला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.
Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
नेमकं काय प्रकरण?
रोशनचे एका तरुणीवर जीवापाड प्रेम होते, यामुळे आरोपी प्रिन्सला राग आला, कारण ती तरुणी प्रिन्सला देखील आवडत होती. त्याने आणि त्याच्या मित्रांनी रोशनला थांबवले आणि त्याला याबाबत विचारले तेव्हा हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. तेव्हा प्रिन्सने चाकू काढून त्याचाच मित्र रोशनवर चाकूने वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना रोशनचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला. रोशनला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी या घटनेची तपासणी सुरु केली. परिसरात असलेले सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्ल्यात पाच जणांचा सहभाग असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ पाहणी करून फोनचे लोकेशन तपासून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले. तसेच स्थानिक नेटवर्कचा वापर करत त्यांना या प्रकरणातील पहिला मोठा सुगावा हाती लागला.
पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी प्रिन्स वर्मा आणि अमन उर्फ बुद्ध या दोन आरोपींना अटक केली. सीसीटीव्हा तपासातून त्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसल्या. यामाध्यमातून आरोपींची ओळख पटली. तेव्हा चौकशीनंतर आरोपी नीरज (वय 18) आणि अंगद (वय 19) तसेच इतर तिघांचे गुन्ह्यात नाव होते. यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून पोलिसांनी अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच हा कट पूर्वनियोजित होता का? असा देखील प्रश्न आता पोलिसांना उपस्थित होत आहे.
धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
Ans: दिल्ली
Ans: प्रेम
Ans: पाच