Kanpur-Delhi Daily Train: भारतीय रेल्वेने कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान दररोज धावणाऱ्या नवीन ट्रेनला मंजुरी दिली आहे. गाडी क्रमांक 14153 कानपूर सेंट्रलहून रात्री 8:40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 4:50 वाजता आनंद विहारला पोहोचेल.
रात्री घराबाहेर सुरू असलेल्या गोंगाटाला आक्षेप घेतल्यानंतर संगीतकार घराकडे परतले; मात्र त्याच्या मागे टोळकेही येऊ लागले. टोळक्यांचा तिसऱ्या मजल्यापर्यंत झालेला पाठलाग, कॉरिडॉरमधील मारहाण आणि त्यानंतर रुग्णालयात झालेला मृत्यू या घटनेने दिल्ली हादरली आहे.
Delhi News: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
दिल्लीतील CJPच्या संसद मोर्चादरम्यान आंदोलनात 'विंचू' घुसल्याचा दावा समोर आला आहे. आंदोलनादरम्यान काही आक्रमक घोषणाही देण्यात आल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. संसद भवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना रोखताना पोलिसांनी कारवाई केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
'नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026'मध्ये डिजिटल परिवर्तन, तंत्रज्ञान आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत सुधांशू त्रिवेदी आणि प्रतापराव जाधव डिजिटल क्रांतीचा रोडमॅप मांडत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर आपले विचार मांडणार आहेत.
दिल्लीमध्ये मोठा दहशतवादी कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून ISI शी संबंधित असल्याचा संशय असलेल्या 9 एजंटांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे संशयित सुरक्षाबळांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर राजधानीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून तपास यंत्र...
दिल्ली विमानतळावर सायबर सुरक्षेचा गंभीर धोका समोर आला असून 18 विमानांनी GPS Spoofing ची तक्रार नोंदवली आहे. या प्रकारामुळे काही उड्डाणांमध्ये विलंब झाल्याची माहिती असून विमान वाहतूक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Mamata Banerjee statement : केंद्रीय दलांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी सीमेचे रक्षण करायला हवे, पण त्याऐवजी ते एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत.
तामिळनाडूतील तिरुपूर येथून अटक केलेल्या ६ जणांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ पेक्षा जास्त सिम कार्ड जप्त करण्यात आली.
दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची शान. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा दर्शवणारा भव्य चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला. गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली...
Supreme Court on Delhi Riots Case: दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उमर खालीद आणि शर्जीलला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
दिल्लीतून 14000 लिटर बनावट कोल्ड्रिंक्स जप्त करण्यात आले आहे. या कोल्ड्रिंक्सवर एक्सपायरी तारीख बदलून नवीन बारकोड लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली-एनसीआरमधून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.