पुणे: पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. भर दिवसा हत्या,चोरी अश्या घटना होत आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे का? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. पोलीस यंत्रणा नेमकं काय करत आहे? असा सवाल देखील विचारण्यात येत आहे. आता पुन्हा एक पुण्यातून एक धक्कदायक घटना घडली आहे. भरदिवसा हत्या करण्यात आल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. ही घटना पुण्यातिल सिंहगड कॉलेज परिसरात झाली आहे. आता या हत्याकांडामुळे पुण्यात सध्या तणावाची स्थिती आहे.
धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
काय घडलं नेमकं?
पुण्यातील सिहंगड कॉलेज परिसरात असलेल्या एका इमारतीजवळ २० वर्षीय तरुणाची हत्या झाली असल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे वय २० वर्षांपेक्षा कमी असल्याचे म्हटले जात आहे. हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. तसेच नंतर दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सोबतच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व पुरावे गोळ्या करण्यात आले आहेत. आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
पुण्यातील पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली. या माहितीनुसार सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज सोसायटीत ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव तौफीर शेख असे आहे. त्याला अगोदर पाच व्यक्तींनी जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला दगडाने ठेचून मारून टाकण्यात आले. या प्रकरणातले काही आरोपी हे अल्पवयीन आहेत. यापैकी दोन आरोपींना याआधीही काही गुन्हे केल्याचा तक्रारी आहेत. तर तौफिर शेख यांच्याविरोधात एकूण चार गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मृत तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे या खुनाचा बदला म्हणून तर शेख याचा काटा काढण्यात आलेला नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.
Uttar Pradesh Crime: धक्कदायक! जुगारात पत्नी “हरली”; सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार
Ans: पुणे
Ans: तौफीर
Ans: पाच






