बीड: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकऱणात दररोज नवनवे खुलासे होत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा धक्कादायक खुसाला केला आहे.
आमदार सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा
आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांच्या भाऊ धनंजय देशमुख आणि मुख्य आरोपी विष्णू चाटे यांच्यात तब्बल ३६ वेळा फोनवर संवाद झाला होता. सुरेश धस यांच्या मते, चाटे वारंवार “आत्ता भाऊंना पाठवतो,” असं सांगत होता, मात्र ३६व्या कॉलनंतर थेट मृतदेहच पाठवला गेला. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मात्र, या क्रूर घटनेला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही मारेकरी अद्याप मोकाट असल्याचं समोर येत आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी दिला राजीनामा; पक्षाचे नेतेपदही सोडले म्हणाले…
आरोपींच्या विरोधात गंभीर गुन्हे
संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यांची हत्या कशी झाली, याबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सुरेश धस म्हणाले,” 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णु चाटेला 36 कॉल केले. 35 कॉलपर्यंत धनंजय देशमुख यांनी विष्णु चाटेला आपल्या भावाला सोडण्याासाठी विनंती केली. प्रत्येक वेळी त्याने 20 मिनिटात तुझ्या भावाला पाठवतो, असं चाटे सांगत होता. धनंजय देशमुख यांना 35 वेळा झालेल्या कॉलवर विष्णु चाटेने हेच सांगितलं. पण 36व्या कॉलला त्याने संतोष देशमुख यांचा मृतदेहच पाठवला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या पुढील स्तराचा गुन्हेगार असल्याचे दिसून येते. या प्रकरणातील आरोपींवर खंडणी, हाफ मर्डर यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर 19 गुन्ह्यांची नोंद आहे, तर सुदर्शन घुलेवर देखील 19 गुन्हे दाखल आहेत. कृष्णा आंधळे आणि महेश केदार यांच्यावर प्रत्येकी सहा गुन्हे, प्रतीक घुलेवर पाच, जयराम चाटेवर तीन, तसेच विष्णू चाटे आणि सुधीर सांगळे यांच्यावर प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. इतके गंभीर गुन्हे दाखल असूनही या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो.
व्हॉट्सॲप चॅट Notification तुमची शांतता भंग करत आहे? मग फक्त 2 मिनिटांत करा ही सेटिंग