अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. राहाता तालुक्यात शिर्डीपासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केलवड-को-हाळे शिवारात विहिरीत पाच मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणात वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
आरोपीचं नाव अरुण सुनील काळे (वय 35) असं नाव आहे. अरुण त्याच्या पत्नीला कायम मारहाण करत होता. त्यामुळे पत्नी घर सोडून वेगळी राहत होती. ही मुलं श्रीगोंदातील मेहकरमधील ही सर्व मुलं आहेत. ती अहिल्यानगर तालुक्यातील वीरभद्र प्राथमिक शाळेत शिकत होती. पत्नी नांदायला येत नसल्याने संतापलेल्या पत्नीला नांदायला ये अन्यथा मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती. काळेंनी मुलांची कटिंग करून आणतो असे सांगून शाळेत गेला होता. त्यानंतर तो मुलांना शाळेतून घेऊन गेला आणि पसार झाला. त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळले.
धक्कदायक म्हणजे मुलांच्या आईने शाळेत फोन करून सांगितलं होतं की मुलांना वडिलांच्या ताब्यात देऊन नका. पण तो पर्यंत शाळेने मुलांना वडिलांच्या ताब्यात दिलं आणि पुढील अनर्थ घडला.
ज्या विहिरीत मुलांचे मृतदेह आढळून आले ती विहीर साधारण ५० फूट खोल आहे. त्यामध्ये ३० ते ३५ फूट पाणी होते. बापासोबत सर्व मुलं या ठिकाणी आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवानी अरुण काळे (वय 8), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे असे मृत तरुणांचे नाव आहे. बापानं या सर्वांना विहरीत ढकलून स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. अरुण काळेचा एक हात आणि पाय बांधल्याचंही आढळलं आहे.
दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
कौशल्या पप्पू कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (वय ३०) याला अटक केली आहे. याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (वय ३६) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी कृष्णा कांबळे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदे करत नाही. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करुन आईला त्रास देत होता. पैसे न दिल्याने त्याने आईला शिवीगाळ केली. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने आाई कौशल्या यांच्यावर चाकूने वार केले. छातीत चाकूने भोसकला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या कृष्णा याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करत आहेत.