Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या

धाराशिवच्या परांडा तालुक्यात कंडारी–सोनारी रस्त्यावर अपघाताचा बनाव करून 35 वर्षीय मोतीराम जाधव यांचा खून केल्याचा उघडकीस आला आहे. जुन्या वादातून दोन मित्रांनी जड वस्तूने डोक्यात वार केल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 18, 2025 | 08:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव: धाराशिव मधून एक हत्येची धक्कदायक बातमी समोर आली आहे. दोन मित्रांनीच आपल्या ३५ वर्षीय मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. जुन्या भांडणाच्या रागातून ही हत्या करण्यात आली. ही हत्या अपघात असल्याचे दाखवण्यात आले. मात्र तो अपघात नसून डोक्यात जड वस्तू वार करून क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप मृतकाच्या पत्नीने केला आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर घडली. आंबी पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून कंडारी परिसरात खळबळ उडाली आहे.

चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच पोलिसांकडून मोठी कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल करून…

नेमकं काय घडलं?

मृतकाचे नाव मोतीराम जाधव असे आहे. मोतीराम हे सोमवारी रात्री ९च्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत होते. त्याच वेळी त्यांचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी मोतीराम यांना पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे. तिकडे जेवण करायला चल, असे म्हणत त्यांना चालू जेवणाच्या ताटावरून उठवले आणि मोटारसायकलवर बसवून सोबत घेऊन गेले. मोतीराम यांना घेऊन गेलेल्या दोन मित्रांपैकी विष्णू तिंबोळे हा रात्री १० च्या सुमारास एकटाच मोतीराम यांच्या घरी आला आणि त्यांनी मोतिरामचं अपघात झाल्याचे सांगितले. कंडारी ते सोनारी रोडवर पप्पु रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाला असे तिंबोळे याने सांगितले.

मृतक मोतिरामची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन हे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोतीराम जाधव हे रस्त्यावर पडलेले होते. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. चेहरा ठेचला गेलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. एवढेच नाही तर काही ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली. अपघात तिघांपैकी केवळ मोतीराम यांचाच कसा झाला. असा जाब पत्नीने विचारला तर आरोपी मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे हा अपघात आहे की घातपात याचा संशय बळावला.

सोनालीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोतीराम जाधव, विष्णु तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या भांडणावरून वाद होता. हे भांडण तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता. ज्यात तात्या रावखंडे हे जखमी झाले होते. जुन्या भांडण्याच्या रागातून विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप फिर्यादीत केला.

घातपात असल्याचं स्पष्ट

पोलिसांनी फिर्याद नोंदवली आणि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आंबी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. फॉरेन्सीक टीमकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात हा अपघात नसून घातपातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंडारी – सोनारी रस्त्यावर घटनास्थळी तात्या रावखंडे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताचे डाग दिसून आले. या ठिकाणाहून रस्त्यापर्यंत रक्ताचे डाग दिसत होते. एवढेच नव्हे तर, काही ठिकाणी रक्ताचे डाग पाण्याने धुऊन काढले असून, काही ठिकाणी माती व वाळू टाकून रक्ताचे निशाण लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. यावरून आरोपींनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

संशयित अटकेत

घटनेनंतर काही तासांतच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हा अपघात नसून, पूर्ववैमनस्यातून केलेला खून आहे का, डोक्यात कोणत्या जड वस्तूने मारले गेले, तसेच तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा आणि खुनाचा काय संबंध आहे, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

Mumbai Airport Customs Raid: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ३ दिवसांत अडीच किलो सोनं आणि ८ किलो ‘ड्रग्ज’ जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात कंडारी–सोनारी रस्त्यावर.

  • Que: खुनाचा आरोप कोणावर आहे?

    Ans: विष्णु कालीदास तिंबोळे व योगेश नागेश तिंबोळे.

  • Que: पोलिसांना संशय कसा आला?

    Ans: जखमांचे स्वरूप, रक्त पुसण्याचे पुरावे व विरोधाभासी माहितीमुळे.

Web Title: Dharashiv crime murder in dharashiv under the guise of an accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी, पालकमंत्री सरनाईक
1

Pratap Sarnaik : अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी, पालकमंत्री सरनाईक

Dharashiv News : डॉक्टरांनी ट्रॅक्टरमधून प्रवास केल्याच्या बिलप्रकरणी गंभीर प्रश्न; नियमभंगाची शक्यता, कायदेशीर चौकशीची मागणी
2

Dharashiv News : डॉक्टरांनी ट्रॅक्टरमधून प्रवास केल्याच्या बिलप्रकरणी गंभीर प्रश्न; नियमभंगाची शक्यता, कायदेशीर चौकशीची मागणी

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले
3

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
4

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.