crime (फोटो सौजन्य: social media )
धुळे: साक्री तालुक्यातील गणेशपूर निवासी आश्रम शाळेतून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. थंडी, ताप, खोकला, सर्दीच्या आजाराची अचानक लागण झाल्याचं समोर आलं आहे. ६१ विध्यार्थी, विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ती (खरवड तालुका, धडगाव जिल्हा, नंदुरबार) येथील रहिवासी आहे.
Nashik Accident: भीषण अपघात! पिकअप आणि कारची समोरासमोर जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू तर…
यात पुन्हा चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुढे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली. तर इतर विध्यार्थ्यानी उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यानं आश्रम शाळेत पाठवण्यात आले आहेत.
ही घटना साक्री तालुक्यातील गणेशपुर येथे निवासी आश्रम शाळेत चालवली जाते. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अचानकपणे गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थ्यांना थंडी, तापच्या आजाराने ग्रासले असल्याची माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल
धुळे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याचा वाढदिवस (9 सप्टेंबर) मंगळवारी साजरा करण्यात आला. त्याच्या दोन दिवसांनी त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विराज गुरुवारी एकटा होता. त्याचे कुटुंबीय बाहेर गेले होते. त्यावेळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना हे दिसलं. त्यांनी तात्काळ विराजला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू आधीच झाल्याचे घोषित केले.
विराजने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. आत्महत्येचा कारण काय असू शकतं हे शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेने धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
टपका रे टपका…; आयुषच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं? लहान भाऊ अर्णवने दिली धक्कादायक माहिती