Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सालियानच्या वडिलांच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं; कोर्टात नेमकं काय घडलं?

सालियनच्या वकिलांनी तिची हत्या केल्याचा दावा केला होता. वकिलांनी पुन्हा चौकशी करण्यात यांवी, अशी मागणी याचिकेतून केली होती. मात्र आता मुंबई हायकोर्टाने वकील निलेश ओझा यांना फटकारले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 08, 2025 | 06:08 PM
दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांना कोर्टानं फटकारलं; नेमकं कारण काय?

दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांना कोर्टानं फटकारलं; नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूला आजही संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मलाड येथे एका गगनचुंबी इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र, या प्रकरणावर अजूनही वाद सुरूच आहेत. सालियनच्या वकिलांनी तिची हत्या केल्याचा दावा केला होता. वकिलांनी पुन्हा चौकशी करण्यात यांवी, अशी मागणी याचिकेतून केली होती. मात्र आता मुंबई हायकोर्टाने वकील निलेश ओझा यांना फटकारले आहे. निलेश ओझा यांनी केलेली वक्तव्य चुकीची आहेत, असं कोर्टाने म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियान यांच्या बाजूने निलेश ओझा हे प्रकरण लढत आहेत. या संपूर्ण प्रकरणात ओझा यांनी जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेतल्या त्यावेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्यावरती आरोप केलेले होते. या सगळ्या क्लिप आज हायकोर्टात सादर करण्यात आल्या. ओझा यांनी केलेले आरोप कोर्टासमोर ऐकवण्यात आले. त्यानंतर पाच न्यायाधीशांचं जे घटनापीठ बसलेलं आहे त्यांनी आज या प्रकरणाच्या सुनावणीला महत्वपूर्ण सुरुवात झाली. यावेळी हायकोर्टात निलेश ओझा यांचा एक बाईट ऐकवण्यात आला. पाच न्यायाधीशांनी हा बाईट ऐकला. या बाईटमध्ये क्लोजर रिपोर्टबद्दल निलेश ओझा हे वक्तव्य करत होते. या पत्रकार परिषदेत निलेश ओझा यांनी न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याच वक्तव्याने न्यायालयाचा अवमान झाल्याने हायकोर्टाने सुमोटो घेतल्याचं स्पष्ट झाले आहे.

यावेळी कोर्टाने निलेश ओझा यांना चांगलेच सुनावले आहे. कोर्टवर असे आरोप करणे, न्यायाधीशांवर आरोप करणे म्हणजे न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखं आहे. निलेश ओझा यांनी केलेली वक्तव्य कोर्टाचा अवमान करणारी आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य ही चुकीची असून यावर कोर्ट असमाधानी आहे. निलेश ओझा यांच्यावर सबंधित कारवाईचे आदेश आम्ही जारी करत आहोत, असे हायकोर्टाने म्हटले.

२९ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

निलेश ओझा हे व्हिडीओ कॉलद्वारे या सुनावणीसाठी जोडले गेले आहेत. निलेश ओझा काहीतरी बोलू पाहत होते, मात्र कोर्टाने सबंधित प्रकरणाची नोटीस स्वीकारा मग बोलू असे सांगितले. आता येत्या २९ एप्रिलला निलेश ओझा यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ही वक्तव्य ज्या माध्यमांवर अपलोड झाली आहेत, ती तात्काळ हटवावी, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

Web Title: Disha salians fathers lawyers have been reprimanded by the court nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • cmomaharashtra
  • Disha Salian
  • Murder Case
  • Sucide

संबंधित बातम्या

Crime News Updates : गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
1

Crime News Updates : गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या
2

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या

Crime News Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार
3

Crime News Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार
4

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.