
Robbery News: तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांचा हल्ला; चाकूचा धाक दाखवून लांबवले सोने आणि रोकड!
मध्यरात्री साधारण २ वाजण्याच्या सुमारास तुकाराम मुंडे यांच्या निवासस्थानी हा सर्व थरार घडला. घरात काहीतरी संशयास्पद हालचाल सुरू असून अनोळखी व्यक्ती शिरल्याची चाहूल लागताच मुंडे यांनी न घाबरता तात्काळ शेजाऱ्यांना आणि गावातील नागरिकांना फोन करून मदतीसाठी बोलावले. घराबाहेर हळूहळू ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली असल्याचे पाहून दरोडेखोर बिथरले आणि त्यांनी तिथून धूम ठोकली. यादरम्यान, हॉलमध्ये झोपलेले ५५ वर्षीय घरकामगार संतोष खंडू शेडगे यांना दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची व शांत राहण्याची धमकी दिली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची कसून पाहणी केली असून, फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करून बंगल्यातून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. फरार झालेल्या इतर दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
आगासन येथील या धाडसी दरोड्यानंतर दिवा शहरातील अपुऱ्या पोलीस यंत्रणेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराची लोकसंख्या आणि नागरीकरण झपाट्याने वाढत असताना येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिसरात चोऱ्या, घरफोड्या आणि सायबर गुन्हे वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नुकतेच ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत, जर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डिजिटल खातेच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
Ans: दिवा परिसरातील आगासन गावातील ‘त्रिनेत्र’ या बंगल्यात मध्यरात्री ८ ते १० सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून हा दरोडा टाकला.
Ans: चोरट्यांनी २.५ तोळे सोने आणि ८०,००० रुपयांची रोकड लंपास केली; तसेच घरमालक तुकाराम मुंडे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करून घरकामगाराला चाकूचा धाक दाखवला.
Ans: मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले असून, एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.