Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali Crime News: साडे सहा हजार कुटुंब बेघर, गॅंग ऑफ डोंबिवलीवर कारवाई कधी होणार? दीपेश म्हात्रेंचा सवाल

साडे सहा हजार कुटुंबाना बेघर होऊ देणार नाही ,त्यांच्या घरांवर कारवाई होऊ देणार नाही ..आदित्य ठाकरेंसह पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, नेमंक प्रकरण काय ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2025 | 03:57 PM
Dombivli : साडे सहा हजार कुटुंब बेघर, गॅंग ऑफ डोंबिवलीवर कारवाई कधी होणार? दीपेश म्हात्रेंचा सवाल

Dombivli : साडे सहा हजार कुटुंब बेघर, गॅंग ऑफ डोंबिवलीवर कारवाई कधी होणार? दीपेश म्हात्रेंचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामावर मनपा कायदेशीर कारवाई करत असताना अनधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्या 65 इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर कारवाईची टांगती तलवार आहे .या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला . या इमारतीमधील रहिवाशांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत घरांवर कारवाई होऊ देणार नाही. याबाबत आदित्य ठाकरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असे सांगितले आहे.

यावेळी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी “ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई मात्र ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई नाही हा कोणता न्याय”असा सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना ज्या कथित बिल्डरांवर गुन्हे दाखल झाले ते बिल्डर नाहीत, सूत्रधार दुसरेच आहेत, खोटे कागदपत्र बनवले खोटे कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशन केले. शासनाची फसवणूक केली मात्र याप्रकरणी खोटी कागदपत्र बनवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही, त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप देखील म्हात्रे यांनी केला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी सांगितले

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या खोट्या कागदपत्राच्या आधारे महारेरा प्रमाणपत्र मिळविलेल्या 65 इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले .त्यानंतर इमारत वाचविण्यासाठी न्यायलयात गेलेल्या साई गलेक्सी इमारतीची याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावल्याने या इमारतीवर कारवाई होण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे या इमारती मधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. आपल्याला खोटी कागदपत्र देऊन आपली फसवणूक करणाऱ्या विकासकावर, पालिका अधिकाऱ्याना रान मोकळे करून आपल्यावर अन्याय का असा प्रश्न या इमारती मधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे .

शिवसेना ठाकरे गटाने रहिवाशांच्या बाजूने आज मेळावा आणि पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे .आज ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व इतर पदाधिकारी या 65 इमारती मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी पत्रकार परिषदेत कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी निवडणुकीत घरांवर कारवाई होऊ देणार नाही असे म्हणनारे नेते निवडणुकीत जिंकून आल्यानंतर कुठे आहेत ,ऑर्डर निवडणुकीत का लपवून ठेवली असा सवाल केला .रहिवाशांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले .

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी याप्रकरणी रहिवाशांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर कारवाई होत आहे ,मात्र ज्यानी रेराचे खोटे पेपर बनवले ,खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, या प्रकरणात अशा कोणत्याही व्यक्तीला अटक केलेली नाही..मग कारवाई फक्त दिखाव्यासाठी होती का असा सवाल केला .

या प्रकरणाची 65 बिल्डरांची यादी दिली ते खरे बिल्डर नाही ,डमी उभे केले आहेत, या यादीत प्रत्यक्ष त्या बांधकाम साइटवर काम करणारे इलेक्ट्रिशन, प्लंबर ,लेबर यांची नावे आहे. त्यांची बांधकाम व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही.हे मोठे रॅकेट आहे ,या रॅकेटला राजकीय वरदहस्त आहे. ते उघड झाले पाहिजे अशी मागणी केली .या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा राहील या लोकांवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी रस्त्यावरची लढाई लढू, त्याचबरोबर न्यायालयीन लढाई देखील लढू असा इशारा जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी दिला आहे .

Web Title: Dombivali crime news when will action be taken against the racket that cheats the residents district chief dipesh mhatres question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • crime
  • dombivali news
  • kdmc area

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.