Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! डोंबिवलीतील खंबाळपाड्यात रिक्षा चालकाची हत्या

डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार वाद झाल्यामुळे दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 03, 2024 | 11:54 AM
धक्कादायक! डोंबिवलीतील खंबाळपाड्यात रिक्षा चालकाची हत्या
Follow Us
Follow Us:

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीमधील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता डोंबिवलीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व येथील खंबाळपाडा परिसरात रिक्षा स्टँडवर रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुनील राठोड याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

नक्की प्रकरण काय?

डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवर अश्विन कांबळे आणि सुनील राठोड या दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. रिक्षा चालकांनी मध्यस्थी करत दोघांचे भांडण सोडवले. परंतु त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे दोघे पुन्हा डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथे असलेल्या रिक्षा स्टँड जवळ उभे होते. या दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. संतापलेल्या सुनील राठोड याने लोखंडी रॉडने अश्विन कांबळेवर हल्ला केला. या हल्ल्यात अश्विन याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील राठोड याला पोलिसांनी अटक केली असून टिळकनगर पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण-डोंबिवलीमधील वाढती गुन्हेगारी

कल्याण डोंबिवलीमधील वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. मागील काही महिन्यांपासून बऱ्याच गुन्हेगारीच्या बातम्या कल्याण डोंबिवलीमधून जास्त येत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन राजकीय वाद सुद्धा पेटले होते त्यावेळी कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला होता यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले होते तर दुसऱ्या वादामध्ये एकाची फेसबुक लाईव्हवर हत्या करण्यात आली होती.

Web Title: Dombivli auto rikshaw driver was killed in khambal pada dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 11:15 AM

Topics:  

  • crime news
  • Dombivli News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
1

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
2

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
3

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
4

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.