Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन लग्न होऊनही प्रेम प्रकरण, फिरायला गेले, जेवणही केले आणि मग…, आंध्रप्रदेशातील धक्कादायक घटना!

आंध्रप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. विशाखापट्टणम येथे एक अर्धवट जळालेला अवस्थेत एक महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृत देह ताब्यात घेत चौकशी केली असता असं काही समोर आलं की पोलिसांनाही धक्काच बसला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2025 | 11:42 AM
andharapradesh (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

andharapradesh (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे अर्धवट जळालेला अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेचा चेहरा इतका जाळला होता की मृतदेह ओळखणे कठीण झाले होते.हा मृतदेह आंध्रप्रदेशच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाकामारी परिसरात ठागरापुवलसा-विजयनगरम रस्त्यालगतच्या फॉर्च्यून लेआउटमध्ये २ मे रोजी सापडला. तिथून जाणाऱ्या एका मेंढपाळाने मृतदेह पाहिला आणि त्याने स्थानिकांना सांगितले.

स्वप्नं मोठी होती… पण तणाव जास्त; परीक्षेच्या ताणात दोन विद्यार्थ्यांचा करुण अंत; अकोल्यात खळबळ

त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली. पुरावे गोळा केले. चेहरा ओळखता येत नसल्याने पोलिसांनी गुलाबी टॉप आणि उंच टाचांच्या सँडल घातलेल्या मुलीचे फोटो काढले आणि आणि सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले. हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींबाबत चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सगळ्या दिशेने चौकशी केली. चौकशीत असं काही समोर आलं की पोलिसांनाही धक्काच बसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी मृत महिलेचा कॉल डेटा तपासला. तेव्हा महिलेची ओळख मधुरवाडा येथील मलिका वोलाशा परिसरातील रहिवासी वेंकटालक्ष्मी अशी झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा मृत महिला एका व्यक्तीसोबत एका दिवसा आधी तिथे आली होती. चौकशी केली असता त्या व्यक्तीची ओळख क्रांती कुमार अशी झाली.

क्रांती कुमारला ताब्यात घेण्यात आले त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा सत्य समोर आले. त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, विजयनगरम नगरातील डेनकाडा येथील वेंकटालक्ष्मीच्या पतीचा मृत्यू दहा वर्षांपूर्वी झाला होता. वेंकटालक्ष्मी मधुरवाडा येथे आपल्या दोन मुलांसह एसएफ 4, ब्लॉक क्रमांक 121, राजीव गृह, मलिका वलसा येथे राहत होती. आरोपी क्रांती कुमार हा ओडिशातील रायगड जिल्ह्यातील कैम्पोमालीगाम येथील रहिवासी आहे.

क्रांती कुमार आपल्या पहिल्या पत्नीला सोडून त्याने दुसरे लग्न केले होते. त्याची पहिली पत्नी आणि मुले ठागरापुवालसा येथे राहतात. त्याने चार वर्षांपूर्वी आपल्या दुसऱ्या पत्नीला राजीव गृह कल्प येथील एका घरात शिफ्ट केले होते. वेंकटालक्ष्मी क्रांती कुमारच्या दुसऱ्या पत्नीच्या शेजारी राहत होती. यामुळेच आरोपी आणि वेंकटालक्ष्मी यांची ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले.

जेव्हा क्रांती कुमारच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या वेंकटालक्ष्मीशी असलेल्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली, तेव्हा तिने क्रांती कुमारशी भांडण केले. त्यानंतर आरोपीने आपल्या दुसऱ्या पत्नीला त्या कॉलनीतील दुसऱ्या ब्लॉकमध्ये शिफ्ट केले. क्रांती कुमारच्या पहिल्या पत्नीलाही त्याच्या वेंकटालक्ष्मीशी असलेल्या प्रेमसंबंधांची माहिती होती. त्यामुळे तो दोन्ही पत्नीच्या दाबावात होता. दोन्ही पत्नींच्या दबावामुळे क्रांती कुमारने कोणत्याही परिस्थितीत वेंकटालक्ष्मीपासून सुटका मिळवण्याची योजना आखली.

क्रांती कुमारने १ मे रोजी, रात्री ८ वाजता वेंकटालक्ष्मीला फोन केला. तिला बाहेर फिरायला जाण्याची विनंती केली. त्यानंतर दोघे बाईकवरून निघाले. दोघे फिरले, नूडल्स आणि आईस्क्रिम खाल्ले, कॉफी प्यायली त्यानंतर मध्यरात्री त्याने वेंकटालक्ष्मीला शहरीरीक संबंधासाठी तयार केले आणि तिला फॉर्च्यून लेआउटमध्ये नेले. तिथे जेव्हा ती झोपली होती, तेव्हा त्याने सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा कापून तिची निर्घृण हत्या केली. त्यांनतर तिच्या गळ्यातील दागिने आणि कानातले काढून आपल्या खिशात ठेवले. त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल वेंकटालक्ष्मीच्या चेहऱ्यावर ओतले, त्याला आग लावली आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.

पोलिसांनी हा खटला अवघ्या सहा तासात सोडवला आणि आरोपी क्रांती कुमारला अटक केली. आता मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्य क्रांती कुमारविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. तकेचे वडील आदिनारायण आणि कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, शिक्षा अशी असावी की क्रांती कुमारसारखा विचार करणाऱ्यांचे हृदय थरथर कापेल. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला असून पुढील कारवाई करत आहे.

फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, एम.डी जप्त, ४ महिलांसह चार पुरुष मित्रांना अटक; नागपूर पोलिसांची कारवाई

Web Title: Due to pressure from both wives lover burned andhra pradesh shook

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप
1

Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप

बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
2

बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त
4

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.