crime(फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नागपूरच्या शहरालगत असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी सुरु होती. नागपूर पोलिसांनी या रेव्ह पार्टी पार्टीवर धाड टाकत ही पार्टी उधळून लावली आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमध्ये चार महिला आणि चार पुरुष सहभागी असल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना या ठिकाणी काही प्रमाणात एम.डी हे अमली पदार्थ ही या ठिकाणी आढळून आले आहे. पोलिसांनी आढळून आलेल्या अमली पदार्थला जप्त केली असून पुढील चौकशी सुरु केली आहे. २६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
भीषण अपघात; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने दोन दुर्घटना, ४ जणांचा मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर- जबलपूर मार्गावरील “एस फार्म” या खाजगी फार्म हाऊसमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर एक पार्टी सुरू होती. त्या पार्टीत अमली पदार्थांचा वापर सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने सामाजिक सुरक्षा पथासह त्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या चार महिला आणि चार पुरुष अश्या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यामध्ये सुनील शंकरलाल अग्रवाल(वय ६१, रा. रामलक्ष्मी कॉलनी, कामठी), गौतम सुशील जैन (वय 51, रा. रामदासपेठ), नीलेश बाबुलाल गडिया (वय 61, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ) आणि मितेश मोहनलाल खक्कर (वय 48, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यावेळी 2 चारचाकी वाहनांसह 6 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण 26 लाखांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी एम.डी हे अमली पदार्थ आढळून आल्याने ते नेमकं कोणी पुरवलं याचा शोध पोलीस घेत आहे.
रामनगरी अयोध्येत लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण; तीन महिने उलटूनही शिपायाला….