sucide (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
गेल्या आठवड्यात म्हणजेच 5 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर करण्यात आले होते. या वर्षी 12वीचे एकूण 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि मुलींनी दरवेळीप्रमाणेयंदाही निकालात बाजी मारली. उत्तीर्ण होण्याऱ्या मुलींची एकूण टक्केवारी 94.58 टक्के इतकी होती तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 89.51 टक्के होता. मात्र तयावेळी २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता अकोल्यातून NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या २ विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी आपले जीवन संपले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
रामनगरी अयोध्येत लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण; तीन महिने उलटूनही शिपायाला….
अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्ययार्थ्यांचे नाव पार्थ गणेश नेमाडे (१७ वर्ष) आणि अर्णव नागेश देबाजे (१८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नावे आहेत. पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील रहिवासी असून तो अकोल्यातील न्यू अकॅडमी येथे शिकवणी वर्षात शिक्षण घेत होता. तर तर अर्णव देबाजे हा अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील रहिवासी आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दोघेही विध्यार्थी निट अभ्यासक्रमाचा सराव करीत होते. दोन्ही विध्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नीटचा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या
NEET चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं होत. नीट परीक्षेचा पेपर बरोबर न गेल्याने नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस येथे घडली. लकी सुनील चव्हाण (19) असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव. पेपर कठीण असल्याने आपण अपेक्षित निकाल देऊ शकत नसल्याच्या भीतीने ही आत्महत्या केली आहे. मृत लकी चव्हाण याने नांदेड येथे कोचिंग क्लासेस करून नीट परीक्षेची तयारी केली होती. मृत लकी चव्हाण यांचे काका मंगल चव्हाण यांनी, काल झालेल्या पेपर ठीक न गेल्याने तो नाराज होता,असे दिग्रस पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
भीषण अपघात; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने दोन दुर्घटना, ४ जणांचा मृत्यू