
अतिरेकी साकिब प्रकरणात उद्योजक सचिन पाकळेची होणार चौकशी
ईडी, आयकर विभागा, एटीएसची राज्यात 40 ठिकाणी छापेमारी
उद्योजक सचिन पाकळेच्या घरी ईडीचे पथक ठाण मांडून
चिपळूण: खैर वृक्षाच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी कृत्यांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी ईडीने (ED), आयकर विभागासह महाराष्ट्र एटीएसच्या सहकार्याने राज्यात ४० ठिकाणी छापेमारी केली. ही छापेमारी भिवंडीतील बोरीवली गाव, पुणे, मालेगाव तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांत केली आहे. याचसोबत दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथेही छापेमारी करण्यात आली आहे.
इसिस’च्या माध्यमातून राज्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या साकिब नाचण आणि पुण्यातील प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. याच प्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यावर ईडीने याप्रकरणी ईसीआयआर दाखल करत गुरुवारी चिपळूण मध्ये उद्योजक सचिन पाकळे यांच्या सावर्डे व खेड सुकीवली कात कारखान्यावर धाड टाकली होती अतिरेकी साकिब यांचा एक मित्राने सचिन पाकले यांना खैराची एक गाडी टाकली होती. त्यावेळी त्यांनी चेक ने व्यवहार केला होता याच धर्तीवर मागे एटीएस यांनी सचिन पाकळे यांची चौकशी केली होती त्यानंतर गुरुवारी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले.
यावेळी सचिन पाकळे नागपूर येथे अधिवेशनाला गेले त्यामुळे घरात त्याची आई व पत्नी होती त्यामुळे अधिकारी यांनी त्यांना मोठा आवाज करून माहिती विचारल्याचे समोर येते त्यामुळे त्या दोघीही घाबरल्या होत्या तर पाकळे नागपूरहून शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सावर्डे येथे दाखल झाले त्यापूर्वीच तीन च्या वाजण्याच्या दरम्यान ईडीचे अधिकारी यांनी त्यांच्या कुटुंबाकडे नोटीस देऊन मुंबईच्या दिशेने निघून गेले त्यामुळे उद्योजक सचिन पाकले यांना ईडीच्या कार्यालयात मुंबई येथे चौकशी साठी बोलविण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर ईडीचा नवा ‘शिकंजा
अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर आणखी कारवाई करत ₹११२० कोटी रुपयांची नवीन मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईत १८ हून अधिक मालमत्तांचा समावेश आहे. यासह, आतापर्यंत अनिल अंबानी समूहाची एकूण ₹१०,११७ कोटी रुपयांची मालमत्ता कुर्क करण्यात आली आहे.