Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde on Nagpur Violence: एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं गेलं; नागपूर हिंसाचाराबाबत एकनाथ शिंदेंना संताप अनावर

राज्याची उपराजधानीत काल (17 मार्च) झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरणही चांगलचं तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरच्या वादावरुन नागपूरमध्ये दंगल झाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2025 | 01:35 PM
Eknath Shinde on Nagpur Violence: एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं गेलं; नागपूर हिंसाचाराबाबत एकनाथ शिंदेंना संताप अनावर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: “छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण योग्य आहे का, असा माझा सवाल आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. औरंगजेबाने आपली मंदिरे पाडली, आपल्या आया बहिणींची अब्रु लुटली, शंभुराजे  सापडत नव्हते तर निष्पाप लोकांचे बळी घेतले. लाखो लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले, हा इतिहास असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण योग्य नाही. आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. एक सच्चा देशभक्त मुसलमानपण या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणार नाही. ” असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपला संताप व्यक्त केला.

राज्याची उपराजधानीत काल (17 मार्च) झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरणही चांगलचं तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरच्या वादावरुन नागपूरमध्ये दंगल झाली. नागपुरातील महाल परिसर, हंसपुरी, मोमीनपुरा या भागासह आसपासच्या परिसरात  मोठ्या जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. वाहनांची तोडफोड तसेच पोलीस दलावर देखील दगडफेक केली. जेसीबी जाळण्यात आला. यामुळे नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असून नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागांतील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू  करण्यात आली.  नागपुरात झालेल्या या हिंसाचाराबाबात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली आहे.

व्यक्तीने मृत्यूला दिले आव्हान, थेट रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपला, अंगावरून गेली ट्रेन अन्… पाहूनच उडेल थरकाप

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ काल नागपुरात औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.   त्यानंतर पोलिसांनी दोन  समाजात मध्यस्थी करत शांतता प्रस्थापित केली. पण रात्री आठ वाजताच दोन-चार हजार लोकांचा मॉब जमला. नागपुरातील महाल परिसर, हंसपुरी, मोमीनपुरा भागात दगडफेक, जाळपोळ झाली. मी व्हिडीओ, फोटो पाहिले, महिलांचा आक्रोश पाहिला, हिंसकांनी घरांवर मोठमोठे दगड टाकले,हॉस्पीटलची तोडफोड केली, तिथल्या देवांचे फोटो जाळून टाकले. तुम्ही आंदोलनाचे प्रत्युत्तर आंदोलनानेच द्या, आंदोलने करा, तुम्ही कायदा हातात घेणार, एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं.”

काल संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात तीन  डिसीपींवर गंभीर हल्ले झाले. हिंसा करणाऱ्यांकडे पेट्रोल  बॉम्ब कुठून आले, गाड्या जाळल्या गेल्या, एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक पार्क केल्या जायच्या, काल त्या ठिकाणीही एकही गाडी पार्क नव्हती. याचा अर्थ कायजाणीव पूर्वक हा कट रचला होता. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यातं आलं. लोकजीव मुठीत धरून होते. पोलीस येईपर्यंत अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. त्यांच्यावरही, कुऱ्हाडी आणि हत्यारांनी वार करण्यात आले.

‘नरेंद्र मोदी पूर्वीजन्मीचे शिवाजी महाराज…’; भाजप खासदाराच्या विधानाने नव्या वादाची ठिणगी

Web Title: Eknath shinde informed the house about the violence in nagpur nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi News
  • Nagpur
  • Nagpur Violence

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.