Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Exploitation: कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी परदेशात पळाला, १४ महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीचा यूएईमधून ताबा!

Women Exploitation: लग्नाचे आमिष दाखवून १४ तरुणींचे शोषण, १८ लाखांचा गंडा आणि प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड करून परदेशात पळालेल्या नराधमाचा खेळ खल्लास! इंटरपोलच्या 'रेड नोटीस'नंतर महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने आरोपी मोहम्मद माजिनला थेट यूएईमधून भारतात आणलं!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 04:38 PM
Women Exploitation: कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी परदेशात पळाला, १४ महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीचा यूएईमधून ताबा!

Women Exploitation: कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी परदेशात पळाला, १४ महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीचा यूएईमधून ताबा!

Follow Us
Follow Us:
  • १४ तरुणींचे शोषण करून आरोपी पसार
  • मुख्य पीडितेची १८ लाखांची फसवणूकइतर १३ महिलांकडून वसुली
  • प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आरोप, सीबीआयच्या ‘रेड नोटीस’वरून यूएईत अटक
Women Exploitation: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १४ तरुणींचे लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करून परदेशात पसार झालेल्या एका सराईत आरोपीला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात आणण्यात भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. महाराष्ट्र पोलिसांना हवा असलेला आरोपी मोहम्मद माजिन याचे २० नोव्हेंबर २०२६ रोजी भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या समन्वयातून ही मोठी कारवाई पार पडली.

हेही वाचा: Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

१४ महिलांची फसवणूक आणि खासगी व्हिडिओही काढले

पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य पीडित तरुणीला आरोपी मोहम्मद माजिन याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करत त्याने तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, आरोपीने अशाच प्रकारे आणखी १३ महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले. या सर्व महिलांकडून त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले; इतकेच नव्हे तर आरोपीने त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे.

इंटरपोलच्या ‘रेड नोटीस’वरून यूएईमध्ये बेड्या

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मोहम्मद माजिन हा कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी परदेशात पळून गेला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनंतर सीबीआयच्या इंटरपोल विभागाने त्याच्याविरोधात ‘रेड नोटीस’ जारी केली होती. या नोटीसच्या आधारे यूएईच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच सक्षम न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले आहे. अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या एका विशेष पथकाने यूएईमध्ये जाऊन आरोपीचा ताबा घेतला आणि २० नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला भारतात आणले.

हेही वाचा: Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात…

फरार आरोपींना भारतात आणण्याचा धडाका

दरम्यान, सीबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ पासून आतापर्यंत इंटरपोलच्या माध्यमातून परदेशात पळून गेलेल्या ३०० हून अधिक फरार आरोपींना भारतात परत आणण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. विशेष म्हणजे, एकट्या २०२६ या वर्षात आतापर्यंत ७४ फरार आरोपींचे भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूएईमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलेल्या आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून १४ तरुणींचे शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद माजिन असून, २० नोव्हेंबर २०२६ रोजी त्याचे यूएईमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले.

  • Que: आरोपी मोहम्मद माजिनवर कोणते गंभीर आरोप आहेत?

    Ans: मुख्य पीडितेची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यासह आणखी १३ तरुणींचे लैंगिक, मानसिक व आर्थिक शोषण करणे, पैसे उकळणे आणि त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.

  • Que: आरोपीला यूएईमधून भारतात कसे आणण्यात आले?

    Ans: महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयच्या इंटरपोल विभागाने जारी केलेल्या 'रेड नोटीस'च्या आधारे यूएई अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आणि महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकाने यूएईमधून त्याचा ताबा घेतला.

Web Title: Extradited from uae to india 14 women exploitation fraud interpol red notice sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Blackmailing Case
  • Crime . Crime News

संबंधित बातम्या

Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड…
1

Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड…

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?
2

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…
3

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!
4

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.