Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड…

Weapon Attack: मुंबईहून पुण्याकडे जाताना एक्सप्रेस वेवर थरकाप उडवणारा प्रकार! पतीने आधी कार ट्रकला धडकवली आणि मग धारदार शस्त्राने पत्नीच्या गालावर व हातांवर केले वार... गंभीर जखमी पत्नीची लोणावळा पोलिसांत धाव!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 01:04 PM
Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड...

Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड...

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीने मुद्दाम कार ट्रकला धडकवून पत्नीवर केले धारदार शस्त्राने वार
  • मुंबईहून पुण्याकडे येताना कात्रज येथील ३६ वर्षीय महिलेवर पतीचा जीवघेणा हल्ला
  • लोणावळा ग्रामीण पोलिसांत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
Weapon Attack: पती-पत्नी मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान रस्त्यातच असा काही थरार घडला, ज्याची पत्नीने कल्पनाही केली नसेल. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पतीने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने आधी कार ट्रकला मागून धडकवली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या गालावर व दोन्ही हातांवर वार करून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:Mumbai Police: गुन्हेगारांना वठणीवर आणणारेच हतबल! महिला कॉन्स्टेबलच्या कथित दहशतीने मुंबई पोलीस दलात खळबळ

एक्सप्रेस वेवर मुद्दाम अपघात घडवून हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक रोड आणि घाटातून येणारा रस्ता पुण्याकडील बाजूस ज्या ठिकाणी एकत्र येतो, त्या मावळ तालुक्यातील परिसरात हा भयंकर प्रकार घडला. कात्रज येथील ३६ वर्षीय महिला आपल्या ४९ वर्षीय पतीसोबत मुंबईहून पुण्याकडे येत होत्या. प्रवासादरम्यान पतीने अचानक मुद्दाम आपली कार समोरच्या ट्रकला मागून धडकवली.

धारदार शस्त्राने वार; पत्नी गंभीर जखमी

कार धडकल्यानंतर पतीने हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या गालावर आणि दोन्ही हातांवर अनेक वार केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. पतीने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद जखमी पत्नीने पोलिसांकडे दिली आहे.

हेही वाचा: Samruddhi Mahamarg: शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक; ‘११२’ वर तीन वेळा कॉल करूनही २ तास मदत नाही, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

पोलिसांकडून तपास सुरू

या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी पत्नीच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: ही घटना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक रोड आणि घाटातून येणारा रस्ता एकत्र येणाऱ्या मावळ तालुक्यातील परिसरात घडली.

  • Que: पतीने पत्नीवर कशाप्रकारे हल्ला केला?

    Ans: मुंबईहून पुण्याकडे जाताना पतीने आधी मुद्दाम कार ट्रकला मागून धडकवली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने ३६ वर्षीय पत्नीच्या गालावर व दोन्ही हातांवर वार करून तिला गंभीर जखमी केले.

  • Que: या प्रकरणात कोणता तपास सुरू आहे?

    Ans: पतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रे तपास करत आहेत

Web Title: Mumbai pune expressway husband attacks wife car crash sharp weapon lonavala sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Attempt to Murder
  • Crime . Crime News
  • Husband and wife
  • Lonavala news
  • maval news
  • Pune-Mumbai expressway

संबंधित बातम्या

स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई
1

स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…
2

Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित
3

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?
4

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.