Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Currency: मिरजमध्ये मोठी कारवाई! चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या बनावट नोटा, पोलिस हवालदारासह पाच जण अटकेत

मिरज पोलिसांनी मोठी कारवाई करत ₹१ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या. कोल्हापूर पोलिस हवालदारासह पाच जण अटकेत. चहाच्या दुकानात झेरॉक्स मशीनवर नोटांची छपाई होत असल्याचे उघड.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 11, 2025 | 09:26 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

मिरज: सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकरणात कोल्हापूर दलातील एका हवालदाराच्या सहभाग आहे. पोलिसांनी हवालदारसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

Mumbai Underworld: छोटा राजनचा साथीदार डीके राव अटकेत; रिअल इस्टेट वादात ‘मसल पॉवर’ म्हणून गुंतवणूकदाराला धमकावल्याचा आरोप

कशी केली कारवाई ?

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील नीलजी बामणी पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ठिकाणी सापळा रचत छापा टाकला आणि सुप्रीत काडापा देसाई या आरोपीस ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले की, या बनावट नोटांची छपाई कलर झेरॉक्स मशीनवर करण्यात येत होती. या प्रकारात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या साखळीचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

तपास सुरु

पोलिसांच्या तपासात उघड झाले की या बनावट नोटांची छपाई कोल्हापूर शहरातील पोलीस हवालदाराच्या चहाच्या दुकानात केली जात होती. हे दुकानच नोटा तयार करण्याचे अड्डे म्हणून वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दुकानच बनावट नोटा कुठे कुठे फिरवल्या गेल्या आणि या टोळीचा अजून कोणाशी संबंध आहे याचा तपास सुरु आहे. पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्यात येत होत्या. प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पोलिसांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले आहे.

आरोपींना पोलिस कोठडी

मुख्य सूत्रधार असलेले पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार (४४, रा. कसबा बावडा) हे पोलिस दलात वाहनचालक म्हणून कार्यरत आहे, सुप्रीत काडापा देसाई (रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (३३, कोरोची), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, टाकाळा), सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, रा. मालाड पूर्व, मुंबई) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने सर्वांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्यातील गुन्हेगाराची वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा यात सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाची चर्चा होतांना दिसत आहे.

अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी हॉटेलचालकाला तिघांची बेदम मारहाण; एकाने तर हातातील कड्याने…

Web Title: Fake currency fake notes worth one crore printed in a tea shop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • crime
  • Fake Currency
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Mumbai Underworld: छोटा राजनचा साथीदार डीके राव अटकेत; रिअल इस्टेट वादात ‘मसल पॉवर’ म्हणून गुंतवणूकदाराला धमकावल्याचा आरोप
1

Mumbai Underworld: छोटा राजनचा साथीदार डीके राव अटकेत; रिअल इस्टेट वादात ‘मसल पॉवर’ म्हणून गुंतवणूकदाराला धमकावल्याचा आरोप

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवून 35 लाखांना घातला गंडा
2

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवून 35 लाखांना घातला गंडा

Delhi Crime : बापरे! पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं
3

Delhi Crime : बापरे! पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं

Pune Crime: पुणे हादरलं! प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून केला खून; मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला
4

Pune Crime: पुणे हादरलं! प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून केला खून; मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.