Fake liquor worth 1 crore 91 thousand seized action by Satara local crime branch
सातारा : राज्य उत्पादन शुल्क सातारा व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली आहे. बोरगाव तालुका सातारा येथील महामार्ग क्र ४७ च्या उरमोडी नदीकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित कारवाई करून 1 कोटी 91 लाख रुपयांची गोवा राज्यातील बनावट दारू जप्त केली. याप्रकरणी सचिन विजय जाधव राहणार अळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली व जमीर हरून पटेल राहणार आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून बनावट दारूचा साठा आणि ट्रक असा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित ट्रकमधून बनावट दारू वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखाली या पथकास सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलीस यांनी महामार्ग क्रमांक 48 च्या सर्विस रोडवर नदीच्या जवळ पहाटे साडेतीन वाजता सापळा रचला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक या छाप्यामध्ये सहभागी होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संबंधित ट्रक टप्प्यात आलेला असताना पोलिसांनी ट्रक अडवून त्याची झडती घेतली त्यावेळी संबंधित इसमांच्या ताब्यात असलेल्या ट्रकमध्ये रॉयल किंग स्पेशल माल्ट व्हिस्की,रॉयल ब्लॅक व्हिस्की अशा वेगवेगळ्या कंपनीच्या 84 लाख 41 हजार 40 विदेशी बनावटी दारूचा साठा व साडेसहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा माल आढळून आला. या कारवाईमध्ये 1 कोटी 91 लाख 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संबंध इसमांवर बोरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फाळके, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्यासह सहकाऱ्यांनी कारवाईत भाग घेतला होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
साताऱ्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ रोजी बॉम्बे रेस्टॉरंट येथील फर्न हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत चैतन्य संजय कांबळे रा. रविवार पेठ सातारा हा बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.दुसऱ्या घटनेत, त्याच परिसरात सिद्धार्थ संजय पाटोळे रा. रविवार पेठ सातारा हा अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.