
crime (फोटो सौजन्य: social media)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कामगिरी सध्या चर्चेत आहे. पोलिसांची एक शंका आणि तोतया अधिकारी अटकेत. केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून फुशारक्या मारत फिरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या चतुराईने ही अटक झाली आहे. हा सगळा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात घडला.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाळूज एमआयडीसी परिसरातील लग्नसमारंभात उपस्थित होते. या कार्यक्रमात PMO सचिव भारत सरकार कार्यालयातील अधिकारी म्हणून एका व्यक्तीचे नाव स्वागतासाठी पुकारण्यात आले. प्रधानमंत्री कार्यालयाचे कोणताही अधिकारी शहरात दौऱ्यावर नाही तर मग हे कोण असा संशय पोलीस उपयुक्त पंकज अतुलकर यांना आला.
त्यामुळे त्यांनी अधिक चौकशीसाठी त्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस केली. त्यावेळी त्यांने त्याचे नाव अशोक भारत ठोंबरे असे सांगितले. तो नीती आयोग भारत सरकार याचा सदस्य असल्याचे सांगितले. परंतु बारकाईने विचापूस करता त्याच्याकडे तसी कुठलीही ओळख पुरावा मिळून आला नाही. तो खोटी माहिती देत असल्याचे निर्दशनास आले.
त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या सुटकेसमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या पाटीवर लाल रंगाच्या अक्षरामध्ये मराठीमध्ये भारत सरकार असे लिहलेली पाटी, तसेच GOVT.OF INDIA असे लिहलेली पाटी व वाहनावर लावण्यासाठी वारण्यात येणारा भारतीय राष्ट्रध्वज अशा वस्तू मिळून आल्या. त्याने सुरक्षेसाठी विकास प्रकाश पांडागळे नावाचा खाजगी बॉडीगार्ड सोबत ठेवला होता. हा सर्व तोतयागिरी प्रकार असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी दोघांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
भाजप युवा नेत्याचा आढळला मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप गूढ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (वय 30) यांचा मृतदेह आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतदेह शुक्रवारी (दि. 14) दुपारी गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला. याघटनेची माहिती स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी पोलिसांना तात्काळ दिली. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला आहे.
Ans: वाळूज
Ans: अतुलकर
Ans: अशोक