Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली

या गोंधळानंतर पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी तातडीने याची खातर जमा करत आरोपी प्रद्युम पाटील हा खरंच उपमुख्यमंत्र्यांचा आहे का, याची माहिती घेतली

  • By anuradha sagar
Updated On: Apr 02, 2026 | 01:32 PM
Pune Fake OSD Case, Pradyumna Patil Arrest,

Pune Fake OSD Case, Pradyumna Patil Arrest,

Follow Us
Follow Us:
  • उपमुख्यमंत्र्यांचा बनावट ओएसडी असल्याचे सांगणाऱ्या एकाला अटक
  • प्रद्युम्न श्रीहरी पाटील (रा. हिंजवडी) असं या व्यक्तीचे नाव
  • हे अधिकारी मंत्र्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असतात
Pune Exclusive:  पुण्यातील परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची दिशाभूल करणाऱ्या आणि उपमुख्यमंत्र्यांचा बनावट ओएसडी असल्याचे सांगणाऱ्या एकाला अटक केली आहे. तपासात हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार ही कारवाई केली  आहे. प्रद्युम्न श्रीहरी पाटील (रा. हिंजवडी) असं या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रद्युम्न पाटीलने पुण्यातील परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही एका गुन्ह्यांमध्ये तपास व्यवस्थित केला नसल्याचा आरोप केला. यावेळी त्याने तो उपमुख्यमंत्र्याचा ओएसडी असल्याचाही दावा केला. इतकेच नव्हे तर त्याने पोलिसांवरच दबाव टाकत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

या गोंधळानंतर पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी तातडीने याची खातर जमा करत आरोपी प्रद्युम पाटील हा खरंच उपमुख्यमंत्र्यांचा आहे का, याची माहिती घेतली. त्यांना मिळालेल्या माहितीत प्रद्युम्न पाटील हा खोटारडा असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याच्या विरोधात पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

OSD म्हणजे नेमके काय?

हे अधिकारी मंत्र्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असतात. त्यांची नियुक्ती मंत्र्यांच्या शिफारशीनुसार पण मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेने केली जाते. हे अधिकारी आयएएस (IAS), राज्य सेवा अधिकारी किंवा खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीही असू शकतात.

त्यांची मुख्य कामे (Responsibilities):

मंत्री आणि सरकारी विभाग (Bureaucracy) यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतात. मंत्र्यांचे आदेश विभागापर्यंत पोहोचवणे आणि विभागाकडून येणाऱ्या फाईल्सवर मंत्र्यांना माहिती देणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी असते कॅबिनेट मंत्र्यांकडे ३ OSD आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ७ ते १० OSD असू शकतात. या पदावर काम करणारी व्यक्ती केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर मंत्र्यांच्या विचारधारेशी आणि कार्यपद्धतीशी सुसंगत असावी लागते.

Maharashtra Politics : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

संबंधित मंत्रालयाचे धोरणात्मक निर्णय घेताना मंत्र्यांना तांत्रिक किंवा राजकीय सल्ला देणे. जर मंत्री एखाद्या विषयावर नवीन असतील, तर त्या विषयाची सखोल माहिती त्यांना OSD करून देतात. मंत्र्यांकडे येणारे अर्ज, निवेदने आणि महत्त्वाच्या फाईल्सचा अभ्यास करून त्यातील मुख्य मुद्दे (Briefing) मंत्र्यांना समजावून सांगणे. मंत्र्यांच्या महत्त्वाच्या बैठका, दौरे आणि कार्यक्रमांचे नियोजन करणे. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्र्यांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तयार करण्यात मदत करणे.

हे प्रामुख्याने प्रशासकीय आणि गोपनीय कामकाजावर लक्ष देतात. हे विशिष्ट प्रकल्प, धोरणे किंवा मंत्र्यांनी सोपवलेल्या विशेष कामांसाठी (Special Tasks) नियुक्त केलेले असतात. मंत्र्यांचा कामाचा ताण कमी करून प्रशासनावर पकड मजबूत ठेवण्यासाठी OSD हे पद अत्यंत महत्त्वाचे असते.

Web Title: Fake osd arrested in pune man impersonates deputy cms official to threaten dcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Pune Police

संबंधित बातम्या

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
1

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न
2

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

Maharashtra Breaking News Today 2026:  होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’, तेलाची बाजारात निर्यात
3

Maharashtra Breaking News Today 2026: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’, तेलाची बाजारात निर्यात

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी
4

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.