Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् कारवाईला ब्रेक; थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केला संवाद

प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर कारवाई होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर ही कारवाई स्थगित करण्यात आली असून, पुनर्वसनाचे कायमस्वरूपी धोरण तयार करण्याची माहिती शिंदे यांनी दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2026 | 04:01 PM
prabhadevi-encroachment-action-stopped-eknath-shinde-ashwini-vaishnaw

prabhadevi-encroachment-action-stopped-eknath-shinde-ashwini-vaishnaw

Follow Us
Follow Us:
  • प्रभादेवी परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण कारवाई
  • एकनाथ शिंदे यांच्या एका फोनने कारवाई स्थगित
  • एकनाथ शिंदे यांचा थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना फोन
Eknath Shinde Ashwini Vaishnav call :  प्रभादेवी : सध्या पुणे व मुंबई शहरामध्ये अतिक्रमण कारवाईचा धडाका वाढला आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील 101 अतिक्रमित बांधकामांवर पश्चिम रेल्वेकडून हातोडा चालवण्यात येणार होता. काल आणि आज ही कारवाई पूर्ण केली जाणार होती. यासाठी मोठ्या प्रमाणात फौज-फाटा दाखल झाला होता. तसेच जेसीबीही दाखल झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनने या कारवाईला ब्रेक लागला आहे.

प्रभादेवी रेल्वे परिसरात पुर्नवसन झाल्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये,अशी मागणी केली जात होती. स्थानिकांनी या कारवाईविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यासाठी मनसे नेते व शिवसेने नेते मैदानात उतरले होते. त्यांनीही ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे प्रशासनाकडून कारवाई थांबवली जात नव्हती. पण यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना फोन केल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये आणलेले सर्व जेसीबी परत गेले असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रेल्वेची तोडक कारवाई आज सुरू झाली होती, ती आता थांबलेली आहे. या जागेमध्ये पन्नास-साठ वर्षांपासून राहणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू होती. मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांशी बोललो आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून कारवाई स्थगित केलेली आहे. यानंतर निर्माण विभाग आणि रेल्वेचा RNDविभाग मिळून पुनर्वसनाचे कायमचे धोरण करणार आहेत.”

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन

पुढे ते म्हणाले, “पुनर्वसनाचे कायमचे धोरण राबवल्यानंतर सर्व लोकांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होणार आहे. रेल्वे आणि राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय दोन्ही मिळून पुनर्विकासाचं धोरण करणार आहोत. यामुळे यांचा कायमचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल.”

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईकर मुंबईतच राहावा, मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या जागेमध्ये राहणाऱ्या लोकांचा पुनर्विकास / पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे, याचं धोरण तयार करतोय.” अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रभादेवीमध्ये किती अतिक्रमित बांधकामांवर कारवाई होणार होती?

    Ans: प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर कारवाई होणार होती.

  • Que: प्रभादेवीतील अतिक्रमण कारवाई का थांबवण्यात आली?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  • Que: पुढे प्रभादेवीतील रहिवाशांसाठी काय निर्णय होणार आहे?

    Ans: शिंदे यांच्या माहितीनुसार, रेल्वे आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून पुनर्वसनाचे कायमस्वरूपी धोरण तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Prabhadevi encroachment action stopped eknath shinde call ashwini vaishnaw political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Ashwini Vaishnav
  • Eknath Shinde
  • political news
  • Prabhadevi

संबंधित बातम्या

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप
1

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
2

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर
3

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर

Sunil Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडला अन् सुनील राऊत संतापले! शायना एनसींच्या अटकेची मागणी, भांडूपमध्ये जोरदार आंदोलन
4

Sunil Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडला अन् सुनील राऊत संतापले! शायना एनसींच्या अटकेची मागणी, भांडूपमध्ये जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.