Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!

Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राचे आशिया प्रमुख परमजीत धनखड यांची फरीदाबादमध्ये निर्घृण हत्या; शेजाऱ्याने १५ राऊंड गोळ्या झाडत पुतण्याच्या लग्नासाठी आलेल्या अधिकाऱ्याचा काढला काटा!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 07, 2026 | 05:26 PM
Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!

Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!

Follow Us
Follow Us:
  • फरीदाबादमध्ये टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची हत्या
  • पार्किंग वाद अन् शेजाऱ्याने झाडल्या १५ गोळ्या
  • आरोपी कुटुंबासह फरार; पोलिसांकडून शोध सुरू
Parking Dispute Murder: दिल्ली-एनसीआरमधील फरीदाबाद येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. धनत्रयोदशीच्या रात्री सेक्टर-२१C मधील एका निवासी इमारतीमध्ये कार पार्किंग आणि कुत्र्याला फिरवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ‘टेक महिंद्रा’ (Tech Mahindra) कंपनीचे ‘आशिया प्रमुख’ (Asia Head) असलेले परमजीत धनखड यांच्यावर त्यांच्याच शेजाऱ्याने पिस्तूलमधून अंधाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्…

पुतण्याच्या लग्नासाठी आले होते भारतात

५० वर्षीय परमजीत धनखड हे आपल्या कुटुंबासह सिंगापूर येथे वास्तव्यास होते. २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुतण्याच्या लग्नसमारंभासाठी ते ५ नोव्हेंबर रोजीच फरीदाबाद येथे आले होते. ६ नोव्हेंबरच्या रात्री परमजीत हे जिमवरून घरी परतले असता, तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मोनू शर्मा याच्याशी पार्किंगमध्ये कार उभी करण्यावरून त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या मोनूने आपल्या परवानाधारक पिस्तूलमधून थेट परमजीत यांच्यावर तब्बल १५ राऊंड गोळ्या झाडल्या. यातील ७ गोळ्या परमजीत यांना लागल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा: Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

जुना वाद आणि पोलीस तपास

मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर राहणारे परमजीत धनखड आणि आरोपी मोनू शर्मा यांच्यात पाळीव कुत्र्याला फिरवणे आणि गाड्यांच्या पार्किंगवरून पूर्वीपासून वाद सुरू होता. या संदर्भात आधीही पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हे टोकदार पाऊल उचलले.

गुन्हा केल्यानंतर आरोपी मोनू शर्मा हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काडतुसांचे रिकामे शेल जप्त केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. सध्या फरीदाबाद पोलीस आणि क्राईम ब्रँचची पथके फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने चक्रे हलवत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फरीदाबादमध्ये हत्या करण्यात आलेले परमजीत धनखड कोण होते?

    Ans: परमजीत धनखड हे ५० वर्षांचे होते आणि ते 'टेक महिंद्रा' कंपनीत 'आशिया प्रमुख' (Asia Head) या उच्च पदावर कार्यरत होते. ते सिंगापूरला राहत असून पुतण्याच्या लग्नासाठी भारतात आले होते.

  • Que: ही हत्या नेमकी कशावरून झाली?

    Ans: इमारतीमध्ये कार पार्किंग आणि पाळीव कुत्र्याला फिरवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली.

  • Que: आरोपीने किती गोळ्या झाडल्या आणि तो कुठे आहे?

    Ans: आरोपी मोनू शर्मा याने पिस्तुलातून १५ राऊंड गोळ्या झाडल्या, ज्यातील ७ गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपी कुटुंबासह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Faridabad tech mahindra asia head paramjeet dhankhar murder parking dispute sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Delhi news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!
1

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर
2

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!
3

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!
4

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.