Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

Murder Case: बीडनंतर आता वैजापुरात अमानुष हत्याकांड; जुन्या वादातून रोहित पठारेची चौकात मारहाण करत हत्या, पाणी मागितल्यावर तोंडावर लघुशंका केल्याच्या आरोपाने खळबळ, पालकमंत्र्यांनी दिले तपासाचे कडक आदेश!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 07, 2026 | 04:28 PM
Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

Follow Us
Follow Us:
  • वैजापुरात जुन्या वादातून रोहित पठारेची चौकात मारहाण करत हत्या
  • पाणी मागताच तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप
  • ५ लाखांची मदत; तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे
Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची घटना अजून ताजी असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर हत्याकांड समोर आले आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी एका तरुणाला चौकात नेऊन बेदम मारहाण करत त्याची निर्घृण हत्या केली. रोहित पठारे असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा: Harry Boxer Arrested: रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा गँगस्टर हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद!

तोंडावर लघुशंका केल्याचा संतापजनक आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या वादातून रोहितला चौकाचौकात फिरवून अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान वेदनेने तडफडणाऱ्या रोहितने आरोपींकडे पिण्याच्या पाण्याची मागणी केली होती. मात्र, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपींपैकी एकाने पाण्याच्या ऐवजी रोहितच्या तोंडावर थेट लघुशंका केल्याचा अत्यंत गंभीर व धक्कादायक दावा पीडिताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पालकमंत्र्यांची धाव, ५ लाखांची मदत अन् पोलिसांवर ताशेरे

ही क्रूर घटना उघडकीस येताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी राज्य सरकारतर्फे मृताच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या भेटीदरम्यान कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला आणि त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

यावेळी कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांनी आरोपींना मदत केल्याचा आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपांची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तपासात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले. या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यासाठी तपास तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.

तीन आरोपींना अटक, ५ पथके रवाना

या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ५ विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.

हेही वाचा: Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: वैजापूर येथे हत्या झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: वैजापूर येथे बेदम मारहाण करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रोहित पठारे असे आहे.

  • Que: या प्रकरणात कुटुंबीयांनी काय गंभीर आरोप केले आहेत?

    Ans: मारहाणीदरम्यान पाणी मागितले असता आरोपीने तोंडावर लघुशंका केल्याचा आणि स्थानिक पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

  • Que: पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणी काय कारवाई केली?

    Ans: पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला ५ लाखांची मदत जाहीर केली असून पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढत तपास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar vaijapur rohit pathare murder case sanjay shirsat sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Murder Case
  • murder case news

संबंधित बातम्या

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!
1

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!
2

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!

Sambhajinagar News : आठ राज्यांत शोधमोहीम ! संभाजीनगर पोलिसांमुळे नागरिकांची दिवाळी गोड, २६७ मोबाइल हस्तगत
3

Sambhajinagar News : आठ राज्यांत शोधमोहीम ! संभाजीनगर पोलिसांमुळे नागरिकांची दिवाळी गोड, २६७ मोबाइल हस्तगत

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…
4

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.