Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एका गाडीतून दुसऱ्या गाडीत बसताना अज्ञात वाहनाने उडवलं अन् क्षणातच…

अकोल्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. पैलपाडानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीत समोर आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2025 | 11:21 AM
देव तारी त्याला...! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्...

देव तारी त्याला...! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्...

Follow Us
Follow Us:

अकोल्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. पैलपाडानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीत समोर आली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू शहरात शोककळा पसरली. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू येथील धीरज शिरसाट (वय ३५) व त्यांची पत्नी अश्विनी शिरसाट (वय ३०) हे दोघेही आपले वाहन (छोटा हत्ती) क्रमांक (एमएच ३० एबी २००६) घेऊन मानकी (ता. कारंजा) येथे जात होते. दरम्यान पैलपाडानजीक सदर वाहनात बिघाड झाला. त्यामुळे त्यांनी पुढील प्रवासासाठी न जाता परतीच्या वाटेवर बोरगाव मंजू येथे येण्यासाठी दुसऱ्या वाहनचालकास मोबाईलवरून टो करून नादुरुस्त गाडी बोरगाव मंजू येथे घेऊन जाण्यासाठी बोलावले. आरिफ खाँ, अहेमद खाँ (वय २८), अन्वर खाँ अब्दुल खाँ (वय २५) हे दोघे नादुरुस्त गाडी जवळ पैलपाडा नजीक पोहोचले.

दरम्यान, समोरच्या टाटा गाडीत बसत असताना मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका अज्ञात मालवाहू वाहनाने भरधाव वेगाने आपल्या साईडला असलेल्या धीरज शिरसाट, अश्विनी शिरसाट, आरिफ खाँ व अन्वर खाँ या चौघांना जोरदार धडक दिली. या धडकेत घटनास्थळी क्षणातच धीरज शिरसाट, अश्विनी सिरसाठ, आरिफ खाँ (वय २८) हे गंभीर जखमी झाले व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्वर खाँ हे गंभीर जखमी झाले.

अपघाताने हिरावला कुटुंबाचा आधार

बोरगाव मंजू येथील धीरज शिरसाट, अश्विनी शिरसाट या दाम्पत्याला एक मुलगा प्रिन्स व एक मुलगी स्वरा अशी लहान असून, ती प्राथमिक शाळेत शिकत आहेत. तर धीरजचे आई-वडील वृध्द असल्याने दोन्ही लहान मुलांचा आधार हरपला आहे. दोघेही आपला छोटा व्यवसाय उभारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, ते व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या वाहनाने कारंजाला जात असता सदर अपघात घडला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Fatal accident on national highway 3 people died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • Accident News
  • Akola Accident
  • crime news

संबंधित बातम्या

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर
1

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
2

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
3

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
4

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.