Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kidnapping News: अवघ्या काही तासांच्या फरकाने तीन अपहरणं! वाळूज परिसरात नेमकं चाललंय तरी काय? टोळी सक्रिय असल्याचा संशय!

Kidnapping News: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात अवघ्या काही तासांत तीन अपहरणं! वडगाव कोल्हाटीतून अल्पवयीन मुलगा, कमळापूरमधून पती अन् विटावा येथून तरुणी पळवली; टोळी सक्रिय असल्याचा संशय अन् पोलिसांचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 23, 2026 | 03:41 PM
Kidnapping News: अवघ्या काही तासांच्या फरकाने तीन अपहरणं! वाळूज परिसरात नेमकं चाललंय तरी काय? टोळी सक्रिय असल्याचा संशय!

Kidnapping News: अवघ्या काही तासांच्या फरकाने तीन अपहरणं! वाळूज परिसरात नेमकं चाललंय तरी काय? टोळी सक्रिय असल्याचा संशय!

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलगा, विवाहित पुरुष आणि तरुणीचे अपहरण
  • वडगाव कोल्हाटी, कमळापूर आणि विटावा भागांतून तिघांना पळवून नेल्याची तक्रार
  • पोलिसांनी BNS अंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले
Kidnapping News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज परिसरात अपहरणाच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परिसरातील विटावा, कमळापूर आणि वडगाव कोल्हाटी या भागांतून एका तरुणीसह एका व्यक्तीला आणि एका अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आहे. या प्रकरणी तीन स्वतंत्र तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: Fairness Cream: जाहिरात पाहिली अन् मागवली फेअरनेस क्रीम! वर्षभराच्या वापरानंतर मुलीची किडनी निकामी; तपासात धक्कादायक…

वडगाव कोल्हाटीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरेनगर परिसरातून एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. सोनाली गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकड करत आहेत.

कमळापूर येथून पतीला पळवले; पत्नीची तक्रार

कमळापूर येथील विठ्ठल वाटिका परिसरात राहणाऱ्या प्रमिला ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या पतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. या प्रकरणी २० नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक १३८७ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस कर्मचारी पालवे करत आहेत.

हेही वाचा: Seized Pune: बंद गोडाऊन आणि शेतातील शेडमध्ये लपलं होतं कोट्यवधींचं कांड? महिनाभराच्या पाळतीनंतर पहाटे सव्वादोनला छापा अन्…

विटावा येथून तरुणी बेपत्ता; टोळी सक्रिय असल्याचा संशय

विटावा (ता. गंगापूर) येथील रिक्षाचालक फिराजी पिठले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीला अज्ञाताने पळवून नेले. या प्रकरणी २० नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक १३८८ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी धाटबळे करत आहेत. अवघ्या काही तासांच्या फरकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचे अशाप्रकारे अपहरण झाल्याने यामागे एखाद्या टोळीचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त होत आहे. सध्या पोलीस तिन्ही घटनांचा स्वतंत्र तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: छत्रपती संभाजीनगरच्या कोणत्या भागांतून अपहरणाच्या घटना समोर आल्या आहेत?

    Ans: वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी, कमळापूर आणि विटावा (ता. गंगापूर) या तीन भागांतून अपहरणाच्या घटना समोर आल्या आहेत.

  • Que: या तिन्ही घटनांमध्ये कोणाकोणाचे अपहरण झाले आहे?

    Ans: वडगाव कोल्हाटीतून एक अल्पवयीन मुलगा, कमळापूरमधून एक विवाहित पुरुष आणि विटावा येथून एका रिक्षाचालकाच्या तरुण मुलीचे अज्ञातांनी अपहरण केले आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणांत कोणती कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी तिन्ही तक्रारींवरून अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) आणि १४०(३) अन्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar kidnapping cases minor boy woman man missing police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news
  • Kidnapping news
  • Missing Case

संबंधित बातम्या

Sambhajinagar Bullion Market : सोनं-चांदी स्वस्त झालं, पण ग्राहकांची प्रतीक्षा कायम; सराफा बाजारात खरेदी मंदावली
1

Sambhajinagar Bullion Market : सोनं-चांदी स्वस्त झालं, पण ग्राहकांची प्रतीक्षा कायम; सराफा बाजारात खरेदी मंदावली

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
2

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णय
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णय

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई
4

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.