Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. लोणी काळभोर भागात तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2026 | 03:54 PM
वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. लोणी काळभोर भागात तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आला आहे. भांडण सोडवायला आलेल्या त्याच्या वृद्ध आजी-आजोबांनाही आरोपींनी खलबत्याने मारहाण केली आहे. या घटनेत तरुणासह आजी-आजोबा जखमी झाले असून, लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

जखमी तरुणाचे नाव आदित्य रामदास मेमाणे (वय १९, रा. फुले वस्ती, सिद्राम मळा, लोणी काळभोर) असे आहे. याप्रकरणी रोहन आजिनाथ लोंढे (वय २६) याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेमाणे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यच्या मित्राचा वाढदिवस साजरा केला जात होता. केक कापताना आदित्यचा आरोपींशी शाब्दिक वाद झाला. तो वाद त्यावेळी मिटला असे वाटत होते, मात्र आरोपींच्या मनात राग कायम होता. त्यातूनच शनिवारी (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री आरोपी आदित्यच्या घराजवळ आले. आरोपींनी घराबाहेरून आदित्यला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यावर त्यांनी आदित्यवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आवाज ऐकून आदित्यचे आजी-आजोबा बाहेर आले. त्यांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते थेट घरात शिरले. घरातील स्वयंपाकघरात असलेला खलबत्ता उचलून आरोपींनी आजी-आजोबांना मारहाण केली. धक्काबुक्कीत वृद्ध आजी-आजोबा खाली पडले. त्यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

हे सुद्धा वाचा : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख

जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका किरकोळ वादातून घरात घुसून वृद्धांवरही हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नाळे पुढील तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कशावरून घडली?

    Ans: मित्राच्या वाढदिवसाला केक कापताना झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. तो वाद नंतर रात्री जीवघेण्या हल्ल्यात बदलला.

  • Que: हल्ला कधी आणि कसा झाला?

    Ans: शनिवारी (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री आरोपी आदित्य मेमाणे याच्या घराजवळ आले. त्यांनी आधी शिवीगाळ केली, मग तीक्ष्ण शस्त्राने वार केले. नंतर घरात घुसून स्वयंपाकघरातील खलबत्याने त्याच्या आजी-आजोबांना मारहाण केली.

  • Que: याप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आदित्य मेमाणे याच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी रोहन आजिनाथ लोंढे (वय २६) याच्यासह तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक नाळे तपास करत आहेत.

Web Title: An incident involving an attack on a young man has taken place in the loni kalbhor area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Kidnapping News: अवघ्या काही तासांच्या फरकाने तीन अपहरणं! वाळूज परिसरात नेमकं चाललंय तरी काय? टोळी सक्रिय असल्याचा संशय!
1

Kidnapping News: अवघ्या काही तासांच्या फरकाने तीन अपहरणं! वाळूज परिसरात नेमकं चाललंय तरी काय? टोळी सक्रिय असल्याचा संशय!

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
2

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णय
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णय

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई
4

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.