Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाच्या ‘या’ पराक्रमामुळे वडिलांवर आली जीव देण्याची वेळ; जतमधील ‘हे’ प्रकरण आहे तरी काय?

जादा परताव्याची योजना असलेल्या शेअर मार्केटची चर्चा सर्वत्र झाल्याने व गुंतविलेल्या मोठ्या रक्कमेवर लगेचच मोठा परतावा मिळतो याचा सर्वत्र गवगवा सुरू झाल्याने तालुक्यातील अनेक जनांनी या शेअर मार्केटमध्ये मोठ्या रक्कमेची गु

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2025 | 02:21 PM
मुलाच्या 'या' पराक्रमामुळे वडिलांवर आली जीव देण्याची वेळ; जतमधील 'हे' प्रकरण आहे तरी काय?

मुलाच्या 'या' पराक्रमामुळे वडिलांवर आली जीव देण्याची वेळ; जतमधील 'हे' प्रकरण आहे तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:
Share Market Fraud: शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देतो म्हणून कोट्यावधी रूपये गोळा करून पळून गेलेल्या मुलाच्या पराक्रमामुळे गुंतवणूकदारांच्या त्रासामुळे एका बापावर आत्महत्या करण्याची वेळ आली, शेअर मार्केटमध्ये जत तालुक्यातून पाचशेकोटीच्यावर गुंतवणूक गोळा केली होती,  शेअर मार्केटमध्ये प्रतिष्ठितांच्या सहभागामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
जत तालुक्यात पाचसहा वर्षापासून मोठ्याप्रमाणात गुंतवलेल्या रक्कमेवर जादा परतावा देऊन विविध स्तरातील नागरिकांना अकर्षित करण्याचा धंदा जोरात सुरू होता. या अल्पावधीतच श्रीमंत करणा-या धंद्याकडे आकृष्ट होऊन अनेकांनी आपली गुंतवणूक या धंद्यामध्ये केली.सुरूवाती सुरूवातीला ज्यानी यामध्ये मोठी गुंतवणूक केली त्यांना त्वरीत मोठा परतावाही मिळाला होता.
जादा परताव्याची योजना असलेल्या शेअर मार्केटची चर्चा सर्वत्र झाल्याने व गुंतविलेल्या मोठ्या रक्कमेवर लगेचच मोठा परतावा मिळतो याचा सर्वत्र गवगवा सुरू झाल्याने तालुक्यातील अनेक जनांनी या शेअर मार्केटमध्ये मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केली. यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,डाॅक्टर, वकिल, इंजिनिअर, राजकिय मंडळी, व्यवसाईक, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली.हेही वाचा: Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला घातला तब्बल 32 लाखांचा गंडा

सबंधित शेअर कंपन्यांच्या प्रतिनिधीनी यातील बहुतांशी मोठ्या गुंतवणूकदारांना देश विदेशात विमान प्रवासही घडवून आणला आहे. कालांतराने या शेअर मार्केटचे जे मुख्य होते त्यांनी गुंतवणूकदारांचे जादा परतावा देतो म्हणून घेतलेले पैसे घेऊन विदेशात पळ काढल्याने जादा परतावा वेळेवर मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार हडबडून गेले व ते आपणाशी संपर्कात असलेल्या वरिष्ठांना मोबाईल व्दारे संपर्क करू लागले.परंतु वरिष्ठ पातळीवरचे सर्वच लोक नाॅटरिचेबल लागू लागल्याने स्थानिक गुंतवणूकदार धास्तावून गेले आहेत.

जे स्थानिक लोक हे या  जादा परताव्याच्या आशेने गुंतवणूकदारांच्या नेहमी संपर्कात आले आहेत त्यांची अवस्था घर का ना घाट का अशी झाली आहे. कारण गुंवणूकदारांकडून जादा परतावा देतो म्हणून शेअर मार्केट कंपनीचा हवाला देऊन ज्या स्थानिक एजंटानी मोठ्या रक्कमा गोळा करून त्या वर कंपनीकडे पाठविल्या आहेत. त्यांच्याशी शेअर मार्केट कंपन्याचे संचालक हे कोणत्याही प्रकारे संपर्कात येत नसल्याने जादा परताव्याच्या अपेक्षेने मोठ्या मोठ्या रक्कमा घेतलेल्या स्थानिक एजंटाकडे गुंतवणूकदार पैसै परत मागीत असल्याने या एजंटावर आपली स्थावर मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागत आहेत.

जत तालुक्यात जादा परताव्याच्या अपेक्षेने शेअर मार्केटमध्ये पाचशेकोटीहून जास्त रक्कम गुंतवली गेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या शेअर मार्केटमुळे जत येथिल शासकिय तंत्रनिकेतन काॅलेजमधील तानाजी गायकवाड या शिपायाला आपल्या मुलांने नितीन यांने जादा परतावा देतो म्हणून गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे वरिष्ठांनी घेऊन विदेशात पळ काढल्याने आपणाला देणे अशक्य असल्याने गुंतवणूकदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून पळ काढला आहे.

हेही वाचा: Cyber Crime: ६५ हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात..! तक्रारीत 15 टक्क्यांनी वाढ, कोटींची फसवणूक

परंतु आपले पैसे घेतलेल्या एजंटाने पळ काढल्याने हे गुंतवणूकदार नितीन याचे वडिल तानाजी गायकवाड यांच्यामागे मुलाने जादा परतावा देतो म्हणून शेअरमार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत करा म्हणून नितिन याच्या अत्यंत जवळचा असणारी आणखी एक एजंट याला जबाबदार न धरता नितीन याचे वडिल तानाजी गायकवाड यांना रस्त्यावर आडविणे,घरात येऊन दाब देणे,माणसिक त्रास देणे असे करू लागल्याने नितीन याचे वडिल तानाजी गायकवाड यांनी सबंधित गुंतवणूकदारांच्या विरोधात जत पोलीसात लेखी तक्रारही दिली आहे.

शेअर मार्केटमुळे आत्महत्या करण्याची वेळ  तानाजी गायकवाड यांच्यावर ज्या गुंतवणूकदारांनी आणली व ज्यांच्या विरोधात गायकवाड यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.अशा सर्वांच्यावर  तानाजी गायकवाड यांच्या आत्महत्येस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्थेचे व्हा.चेअरमन श्रीकृष्ण पाटील यांनी केली आहे.

Web Title: Father loss their life because son invest in share market more returns online cyber fraud crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • cyber crime
  • online fraud

संबंधित बातम्या

Cyber Fraud News: परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा
1

Cyber Fraud News: परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा

मोबाईल युजर्सनो सावधान! सायबर क्राईम युनिटचा मोठा इशारा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं
2

मोबाईल युजर्सनो सावधान! सायबर क्राईम युनिटचा मोठा इशारा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक
3

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा
4

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.