पुणे: शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे. त्यांच्या मोबाइलवर गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवित मॅसेज पाठविला होता.
चोरट्याने त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांना एका ग्रुपमध्ये ऍड केले. शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली. महिलेने चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे गुंतविले. सुरुवातीला महिलेला परतावा मिळाल्याने तिचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्याने महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. महिलेने चोरट्याच्या खात्यात ३२ लाख रुपये जमा केले. महिलेला परतावा देण्यात आला नाही. महिलेने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्यचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार तपास करत आहेत.
Cyber Fraud झाल्यानंतर फटाफट करा ‘हे’ काम
आजकाल आपली सगळी कामं ऑनलाईन झाल्यामुळे ऑनलाईन स्कॅम देखील वाढले आहे. रोज आपण अशा अनेक बातम्या बघत असतो ज्यात लोकांना खासकरून जेष्ठ नागरिकांना हॅकर्स मंडळी लाखांचा गंडा घालतात. यामुळे फक्त जेष्ठांमध्येच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे. अनेक जण तर ऑनलाईन पेमेंट करायला सुद्धा घाबरत असतात. पण योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन स्कॅम टाळू शकता.
हेही वाचा: Cyber Crime: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तरूणाला लुटले; तब्बल २१ लाखांना घातला गंडा
ऑनलाईन स्कॅम झाल्यानंतर, सर्वप्रथम तुमच्या बँकेला फसवणुकीची माहिती द्या. यांनतर तुमची बँक तुमचे बँक खाते फ्रिज करेल, त्यामुळे त्यातील पैशांचे व्यवहार थांबतील. याशिवाय तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बँकेतून ब्लॉक करा. हे काम केल्यानंतर, सायबर पोलिसांना या प्रकरणाची माहिती द्या आणि नॅशनल सायबर क्राइम रिपोर्ट पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवा. यासोबतच सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करूनही तुम्हाला मदत मागता येईल.
हेही वाचा: Cyber Fraud झाल्यानंतर फटाफट करा ‘हे’ काम; होणार नाही ‘Scam’, उत्तराखंडात 40 जणांना परत मिळाले पैसे
वास्तविक, सायबर फ्रॉडमध्ये फसवणूक करणारे लोकांच्या खात्यातून पैसे त्यांच्या स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असतात. जर रक्कम जास्त असेल तर ती अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करावी लागेल. ही रक्कम खात्यातून काढण्यासाठी थोडा वेळ लागतो. या काळात सक्रिय राहून, तुम्ही तुमचे पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खिशात जाण्यापासून रोखू शकता, परंतु एकदा फसवणूक करणाऱ्यांनी खात्यातून पैसे काढले की ते परत मिळवणे खूपच कठीण होऊन होते.