crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: मोटार पुढे नेण्याच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कोरेगाव पार्क भागातील एका तारांकित हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी पोलिसांकडून दोन मोटारचालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव हादरलं! दारुड्या मुलाच्या त्रासाने जन्मदात्याने केली हत्या, मृतदेह रस्त्यावर टाकून बनाव…..
नेमकं काय घडलं?
रविवारी दुपारी मोटार पुढे नेण्यावरून मोटारचालकांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. मुंढवा पोलिसांकडून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरीविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी आचल हरिनखेडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भर रस्त्यात हाणामारी झाल्यानंतर कोरेगाव ते मुंढवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोळी निरीक्षक माया देवरे, तसेच या भागात गस्त घालणारे गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दोन्ही मोटारचालकांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मारामारी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धक्कादायक ! मोबाईल दिला नाही म्हणून एकास मारहाण; मारहाणीत जखमी होताच…
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच मोबाईल न दिल्याने मारहाण करून एकास जखमी करण्यात आल्याची घटना समोर आली. ही घटना वायगाव (नि.) येथे बुधवारी (दि. 18) घडली. अमोल विठ्ठल राऊत (रा. कुरझडी) असे जखमीचे नाव आहे.
अमोल व त्याचे मित्र हे दोघे मित्राच्या बहिणीकडे कानगाव येथे गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान वायगाव (नि.) येथे त्यांना कुरझडी येथील रहिवासी संदीप कुरसंगे भेटला. त्याने मोबाईलची मागणी केली. अमोल याने मोबाईल देण्यास नकार दिला. याच नकाराचा राग आरोपी संदीपला प्रचंड आला. त्यानंतर संदीपने अमोल यास बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी संदीप कुरसंगे याच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, सध्या किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच आता फक्त मोबाईल दिला नाही म्हणून बेदम मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा एकदा वाढती गुन्हेगारी हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
स्वामींच्या मठात रात्री आढळली महिला; ग्रामस्थांचा संताप, मठातून हकालपट्टी