जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्यानेच आपल्या मद्यपी मुलाची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना जळगाव येथील कसबा पिंपरी भागात घडला आहे. शुभम सुरडकर (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारुड्या पोराच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्यानेत डोक्यात दगड घालून आपल्या पोराची हत्या केली. त्यानंतर निर्जन रस्त्यावर मृतदेह टाकून दुसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीने हत्या केल्याचं बनाव करण्याचा प्रयत्न केला. आरोपी वडिलांचं नाव धनराज सुपडू सुरडकर हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भरधाव ट्रकची दुचाकीसह दोन कारला धडक; दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू
काय घडलं नेमकं ?
धनराज सुपडू सुरडकर त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह जळगाव जिल्ह्यातील कसबा पिंपरी येथे राहत होते. त्यांचा मोठा मुलगा शुभम सुरडकर याला दारूचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वीच शुभमची पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती. शुभम दारू पियुन कुटुंबातील इतर लोकांशी कायम वाद घालायचा. या त्रासाला कंटाळून वडील धनराज यांनी शनिवारी रात्री त्याच्या डोक्यात दगड घातला. हा वार एवढा जोरात बसला होता की शुभमच्या जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर ही घटना लपवण्यासाठी धनराज सुरडकर यांनी त्यांच्या लहान मुलगा गौरवच्या मदतीने, शुभमचा मृतदेह मध्यरात्री फत्तेपूर-पिंपरी बायपासवरील एकाकी ठिकाणी नेऊन टाकला. यामागे कुणीतरी बाहेरच्याने हत्या केली आहे, असा बनाव करण्यात आला.पण खून केल्यानंतर मानसिक तणावाखाली असलेले धनराज पुन्हा गावात परतले आणि त्यांनी त्यांच्या भावाला हिरालाल सुरडकर याला घरी बोलवून संपूर्ण प्रकार सांगितला. तिघांनी मिळून ही गोष्ट गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी निर्जन ठिकाणी शुभमचा मृतदेह सापडल्यावर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाच्या मदतीने व तांत्रिक तपासांती पोलिसांचा संशय घरच्यांवर गेला. चौकशीदरम्यान अखेर खऱ्या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी शुभमचा खून करणारा वडील धनराज, भाऊ गौरव आणि काका हिरालाल अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
पुण्यात घरफोडीच्या घटना सुरूच; ‘या’ भागातील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लांबविला